घरराजकारणLok Sabha 2024: वंचितला धक्का! या मतदारसंघातील उमेदवाराचा अर्ज बाद, कारण काय?

Lok Sabha 2024: वंचितला धक्का! या मतदारसंघातील उमेदवाराचा अर्ज बाद, कारण काय?

Subscribe

वंचितचे उमेदवार अभिजीत राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.

यवतमाळ: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीने अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यातच यवतमाळ – वाशिम या लोकसभेच्या मतदारसंघात वंचितने ऐनवेळी उमेदवर बदलून नव्या चेहऱ्याला संधी दिली होती. आता याच उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली होती. पण, अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. (Lok Sabha Election 2024 The application of the candidate Vanchit Bahujan Aaghadi Abhijeet Rathore rejected )

विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदासंघासाठी आपला नामनिर्देश पत्र सादर करण्याची काल 4 एप्रिलच्या दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची तारीख होती. तर आज या नामनिर्देश पत्राची छाननी केली जाणार आहे. दरम्यान यावतमाळच्या नामनिर्देश स्विकृती कक्षात ही प्रक्रिया करत असताना वंचितचे उमेदवार अभिजीत राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

वंचितने अनेक उमेदवार बदलले (Vanchit Bahujan Aaghadi)

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीने वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केले आहेत. त्यापैकी तीन उमेदवार वंचितने बदलले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे माघार घेत असल्याचे सांगत शंकर चहांदे यांना काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये .यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना उमेजवारी दिली होती. त्यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली होती.

महायुतीने यवतमाळमध्ये पाच वेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांच्याऐवजी शिवसेनेच्या राजश्री पाटली यांना उमेदवारी दिली आहे. त्या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. महायुतीनेसुद्धा ऐनवेळी भावना गवळी त्यांच्या जागी राजश्री यांना उमेदवारी दिली. तर दुसऱ्या बाजूला मविआकडून यवतमाळमध्ये ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांना उमेदवारी दिली गेली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha Election 2024 : मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचा अधिकार नाही, काँग्रेसची टीका)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -