Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health दीर्घायुष्य हवे मग फॉलो करा 'हे' नियम

दीर्घायुष्य हवे मग फॉलो करा ‘हे’ नियम

Subscribe

दीर्घायुष्य जगावे असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र आपण नकळतपणे अशी लाइफस्टाइल जगतो त्यामुळे आपल्या आयुष्याची काही वर्ष ही कमी होतात. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, लोकांना दीर्घकाळ आयुष्य जगायचे असते. मात्र त्यासाठी नक्की काय करावे हे कळत नाही. पुढील काही नियम जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फॉलो केले तर नक्कीच दीर्घायुष्य जगू शकता. (long life tips)

व्हिटॅमिन डी चे सेवन
व्हिटॅमिन डी ची कमतरता ही एक सामान्य ग्लोबल समस्या आहे. जगभरातील जवळजवळ 1 बिलियन लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. खरंतर व्हिटॅमिन डी मजबूत हाडे. स्नायू आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राखण्यासाठी मदत करते. खरंतर आपल्या शरीरात स्वाभाविकपणे सूर्याच्या संपर्कात आपण आल्यानंतर व्हिटॅमिन डी मिळते. मात्र याची कमतरता असेल तर डाएट मध्ये सॅल्मन, टूना आणि डेअरी प्रोडक्ट्स जे फोर्टिफाइड असतात त्यांचा समावेश करावा.

- Advertisement -

सकारात्मक विचार
एका अभ्सासातून असे समोर आले आहे की, आनंदी आयुष्य जगायचे असेल तर नेहमीच सकारात्मक विचार करावा. यामुळे तुम्ही दीर्घायुष्य जगता. त्याचसोबत काही आजारांपासून ही दूर राहण्यास मदत होते. याचे अन्य काही फायदे ही आरोग्याला होतात.

स्क्रिन टाइम कमी करणे
तुम्ही जेवढा अधिक वेळ सोशल मीडियात घालवात तेवढाच झोपेचा कालावधी कमी होईल. झोप पूर्ण न झाल्यास तुम्ही कामे व्यवस्थितीत करू शकत नाही. या व्यतिरिक्त तुमच्यामध्ये डिप्रेशन, स्ट्रेस, इंफ्लामेशन होऊ लागते. यामुळे तुमचा आयुष्य जगण्याचा कालावधी ही कमी होतो. त्यामुळे गरजेचे आहे की, तुम्ही स्क्रिन टाइम लवकरात लवकर कमी करावे आणि झोपण्याच्या पॅटर्नमध्ये सुधार करावा.

- Advertisement -

पुरेशी झोप
जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक आहे. पुरेशी झोप न घेतल्याने तुम्हाला टाइप-2 मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि नैराश्य अशा समस्या होऊ शकतात. यामुळे तुमचे लाइफस्पॅन कमी होते. त्यामुळे तुम्ही 7-9 तासांची पुरेशी झोप घेतली पाहिजे.


हेही वाचा- हृदय healthy राहण्यासाठी हसणं गरजेचं

 

- Advertisment -

Manini