Sunday, May 5, 2024
घरमानिनीHealthAC चे असे ही साईड इफेक्ट, शरीराला येईल सूज आणि लवकर व्हाल म्हातारे

AC चे असे ही साईड इफेक्ट, शरीराला येईल सूज आणि लवकर व्हाल म्हातारे

Subscribe

घर असो किंवा ऑफिस, गाडी किंवा मॉल प्रत्येक ठिकाणी एसीचा वापर केला जातो. काही लोकांना तर एसीशिवाय राहणे फार मुश्किल होते. परंतु पावसाळ्यात ह्युमिडिटी वाढली जाते आणि त्यामुळेच एसी मध्ये सतत रहावे असे वाटते. परंतु नेहमीच एसीत राहणे तुम्हाला आजारी पाडू शकते. या व्यतिरिक्त या सवयीमुळे लठ्ठपणाची सुद्धा समस्या उद्भवू शकते. (Health effect of AC)

एसीमध्ये झोपणे आरोग्यासाठी घातक
इंटरनॅशनल जनरल ऑफ ओबेसिटीने जगभरातील लोकांमध्ये वाढत असलेल्या लठ्ठपणावर रिसर्च केला. रिसर्चनुसार, लठ्ठपणा हा व्यायाम न केल्याने आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने नव्हे तर एसीत सतत बसून वाढतो. संशोधकांच्या मते, एसीमध्ये राहिल्याने शरिराचे तापमान कमी राखण्यास मेहनत करावी लागत नाही. त्यामुळे कमी कॅलरीज बर्न होतात. बेडवर झोपून ज्या कॅलरीज बर्न होतात त्याला बेसल मेटाबोलिक रेट असे म्हटले जाते. परंतु एसीशिवाय झोपल्याने 70 टक्के कॅलरीज बर्न होतात.

- Advertisement -

एसीत राहिल्याने ओव्हरइटिंग होते
काही रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की, थंड हवेमुळे भुक वाढली जाते. एसीत झोपल्यानंतर शांत झोप लागते. जेव्हा शांत झोप लागते तेव्हा भूक सुद्धा वाढते. अशातच हाय कॅलरी आणि हाय कार्बोहाइड्रेट्स फूड्स शरिराला गरम ठेवतात. त्यामुळे भूक लागल्याने ओव्हरइटिंग केले जाते आणि लठ्ठपणा वाढतो.

- Advertisement -

मेंदूवर होतो परिणाम
अधिक थंड एसीत बसू नये असा सल्ला तज्ञ देतात. याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. पावसाळ्यात वातावरणातील तापमानत कधीकधी 38 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक होते. जर तुम्ही घरातील एसीचे तापमान 18-20 सेल्सियस ठेवता तर मेंदूत असलेले हाइपोथेलेमसला नुकसान पोहचते.

मेंदूचा हा हिस्सा शरिराच्या तापमानाला रेग्युलेट करतो. जर व्यक्ती अधिक थंड तापमानातून अचानक गरम तापमानात येतो तेव्हा हाइपोथेलेमस शरिरातील तापमानाला लगेच बदलू शकत नाही. अशातच व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला आणि सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.

चेहऱ्यावर वेळेआधीच चेहऱ्यावर पडतात सुरकुत्या
एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, एसीत राहिल्याने जेव्हा शरिरातील ओलावा कमी होतो तेव्हा वेळेआधीत चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. म्हणजेच एजिंगची समस्या सुरु होते. थंडी आणि ड्राय हवेत राहिल्याने घाम कमी आणि तेल अधिक निघते. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स सुद्धा येऊ शकतात. रोम छिद्र सुद्धा बंद होऊ शकतात आणि यामुळे स्किन इंन्फेक्शन होऊ शकते.


हेही वाचा- सकाळी उठल्यानंतर फोन तपासून पाहण्याची सवय पडेल महागात

- Advertisment -

Manini