घरक्राइमअल्पवयीन मुलीला कामावर ठेवले, मारहाण केली; लोकांनी महिला पायलट आणि तिच्या पतीला...

अल्पवयीन मुलीला कामावर ठेवले, मारहाण केली; लोकांनी महिला पायलट आणि तिच्या पतीला दिला चोप

Subscribe

नवी दिल्ली : नवी दिल्लीत (New Delhi) महिला पायलट (Woman Pilot) आणि तिच्या पतीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक दोघांनाही बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ द्वारका (Dwarka) भागातील असल्याचे सांगण्यात येत असून ही घटना बुधवारी सकाळची आहे. (Underage girl employed, beaten; People gave chops to the female pilot and her husband)

हेही वाचा – Jonson & Jonson : बेबी पावडरच्या वापरामुळे कॅन्सर झाल्याचा दावा; कंपनीला दीड अब्ज रुपयांचा दंड

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील द्वारका भागात राहणाऱ्या महिला पायलट आणि तिच्या पतीने अल्पवयीन मुलीला दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी नोकर म्हणून कामावर ठेवले होते. याचदरम्यान त्यांनी या मुलीला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुलीला मारहाण केल्यामुळे तिच्या शरीरावर अनेक खोल जखमांच्या खुणा दिसत होत्या. मुलीच्या आई-वडिलांनी तिला या अवस्थेत पाहिल्यानंतर महिला पायलट आणि तिच्या पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्याठिकाणी उपस्थित लोकांनी महिला पायलट आणि तिच्या पतीला चांगलाच चोप दिला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेक लोक महिला आणि तिच्या पतीला मारहाण करताना दिसत आहेत. तसेच मुलीसोबत खूप चुकीचे केल्याचे म्हणत आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पायलट आणि एअरलाइन्समध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करणाऱ्या तिच्या पतीविरोधात अल्पवयीन मुलीला कामावर ठेवणे आणि मारहाणीसह अनेक कलमे लावताना गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच पोलिसांनी महिला पायलट आणि तिच्या पतीला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा – Lok sabha election 2024 : नव्या डावासाठी नवे भिडू, भाजपाने जुन्या मित्रांना सारले बाजूला

द्वारकाचे डीसीपी एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास द्वारका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याची माहिती मिळाली. आम्ही या प्रकरणी चौकशी केली असता, दाम्पत्याने अल्पवयीन मुलीला दोन महिन्यांपासून घरकामासाठी ठेवले होते. तसेच मुलीच्या अंगावर भाजण्याच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे बालकामगार कायदा व इतर कायद्यांतर्गत दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दाम्पत्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे डीसीपी एम हर्षवर्धन यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -