घरमुंबईमी माझ्या मुंबईसाठी लढतोय, मी यांना मुंबई लुटू देणार नाही-आदित्य ठाकरे

मी माझ्या मुंबईसाठी लढतोय, मी यांना मुंबई लुटू देणार नाही-आदित्य ठाकरे

Subscribe

स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची लोकायुक्ताच्या माध्यमातूनच चौकशी व्हावी या मागणीसाठी आग्रही असलेल्या आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र राज्यपालांना दिले असल्याचे त्यांनी सांगतिले.

मुंबई ः मुंबई महानगरपालिकेत झालेल्या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याबाबत आक्रमक झालेल्या आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची लोकायुक्ताच्या माध्यमातूनच चौकशी व्हावी या मागणीसाठी आग्रही असलेल्या आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र राज्यपालांना दिले असल्याचे त्यांनी सांगतिले.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हटले की, आम्ही मुंबई महानगरपालिकेत झालेल्या विविध घोटाळ्या संदर्भात सातत्याने आवाज उठवत आहोत. मात्र, घटनाबाह्य मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करीत असून, नुसते चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे. क्लिनचिट देण्यासाठीच चौकशी केली जात आहे का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर राज्यपालाना दिलेल्या पत्रात नमुद असल्याप्रमाणे महानगरपालिकेत झालेल्या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी व्हावी, त्यासाठी आधी महानगरपालिकेने स्टॉप वर्क ऑर्डर काढून स्टॉप पेमेंट ऑर्डर देऊन कंत्राटदारांना दिलेले पैसे परत घेण्याच्या मागणीसोबतच आदित्य ठाकरे यांनी घोटाळ्याचे सगळे कागदपत्रे देण्यात यावी अशीही मागणी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

शासन आपल्या दारीतून 52 कोटी रुपये खर्च
शासन आपल्या दारी या मोहीमेसाठी आतापर्यंत 52 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जर या योजनेसाठी एवढे पैसे खर्च होत असतील तर मग जाहिरातीवर, होर्डींगवर किती खर्च झाला असेल. तेच पैसे विद्यार्थ्यांसाठी अत्याचारीत महिलांसाठी खर्च केले असते तर त्यांना मदत झाली असती असेही ते यावेळी म्हणाले.

पुढील सरकार आमचेच असणार आहे
काल विरोधकांच्या झालेल्या बैठकीसंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अगदी खेळी-मेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली. पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल याबाबत अद्याप काही जरी ठरले नसले तरी ते लवकरच ठरेल. तर आता जरी हे सत्ताधारी उत्तरे देणार नसले तरी पुढील सरकार आमचेच असणार आहे आणि तेव्हा यांना उत्तरे द्यावे लागतील.

- Advertisement -

मी त्या घाणीवर काही बोलत नाही
यावेळी उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात विचारले असता मी त्या घाणीवर काही बोलणार नसल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी किरीट सोमय्या प्रकरणावर बोलणे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -