Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenBroccoli Soup : हेल्दी ब्रोकली सूप

Broccoli Soup : हेल्दी ब्रोकली सूप

Subscribe

ब्रोकोलीमध्ये जीवनसत्वासोबत कॅलशियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, ओमेगा 3, क्रोमियम, पोटॅशियम असतात. त्यामुळे त्याचे सेवन करणं उत्तम मानले जाते. आज आम्ही तुम्हाला ब्रोकलीचं सूप कसं करायचं हे सांगणार आहोत.

साहित्य :

 • 250 ग्रॅम ब्रोकोली
 • 2 टोमॅटो बारीक चिरलेले
 • 2 बटाटे बारीक चिरलेले
 • थोडी काळी मिरची
 • 2 चमचे दही
 • 4-5 लवंग
 • आलं
 • थोडी दालचिनी
 • कोथिंबीर
 • चवीनुसार मीठ

कृती :

Easy Broccoli and Pea Soup (in 15 Minutes) | Somebody Feed Seb

- Advertisement -
 • पहिल्यांदा ब्रोकोलीला पाच मिनिटं पाण्यात उकळून घ्या. नंतर एका पॅनमध्ये दही टाकून त्याच्यात काळी मिरची, लवंग आणि दालचिनीची पूड घाला.
 • मग आलं, बटाटे, टोमॅटो आणि थोड पाणी घालून काही वेळासाठी शिजवत ठेवा.त्यानंतर सर्व मिश्रण बारीक करून घ्या.
 • आता एका पॅनमध्ये ब्रोकोली, बारीक कापलेले बटाटे आणि टोमॅटो आणि आलं दोन ते तीन मिनिटं शिजवा.
 • त्यानंतर चवीनुसार त्यात मीठ घाला. बारीक केलेले मिश्रण मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यावर कोथिंबिर घालून सर्व्ह करा.

हेही वाचा :

Receipe : रव्यापासून बनवा चविष्ट पिझ्झा

- Advertisment -

Manini