Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthAcidity कमी करण्यासाठी मुलेठी येईल कामी

Acidity कमी करण्यासाठी मुलेठी येईल कामी

Subscribe

अॅसिडिटी पोटाच्या समस्यांपैकी एक आहे. बहुतांशजणांना अॅसिडिटीचा त्रास होतो. खरंतर अनहेल्दी फूड्सचे सेवन आणि अयोग्य डाएटमुळे अॅसिडिटी समस्या उद्भवू शकते. बहुतांश जण या समस्येपासून दूर राहण्यासाठी थंड दूध पितात. तर काहीजण बडीशेपचे सेवन करतात. परंतु मुलेठीच्या सहाय्याने तुम्ही अॅसिडिटीची समस्या कमी कशी दूर करू शकता याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

आयुर्वेदात मुलेठीचा वापर हा उपचारासाठी खुप वर्षांपासून केला जातो. हे एक नैसर्गिक औषधाप्रमाणे आहे. याचा वापर जीईआरडी आणि या संबंधित पोटाचे विकार दूर केले जाऊ शकतात. ग्लाइसीर्रिजिन नावाच्या यौगिक कारणास्तव पोटातील ब्लड पीएचचा स्तर कमी करणे आणि पचनास मदत करते. मुलेठीमुळे पोटासंबंधित आजार, पचनतंत्राला सूज येणे, छातीत जळजळणे अशा समस्या दूर होतात.

- Advertisement -

पचनास मदत करते मुलेठी
मुलेठीमध्ये ग्लाइसीराइजिन असते. त्याची चव गोड असते आणि पचनास मदत करते. तुम्हाला पचनसंबंधित समस्या असेल तर तुम्ही मुलेठीची चहा पिऊ शकता. कारण तुम्हाला अॅसिडिटी दरम्यान होणारी समस्या आणि जळजळ यामुळे कमी होण्यास मदत होईल.

- Advertisement -

रोगप्रतिकारकशक्ती वाढते
मुलेठीच्या मुळांमध्ये असलेले एंजाइम लिम्फोसाइट्स आणि मॅक्रोफेजचे उत्पादन करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही काही रोगांपासून दूर राहता. या व्यतिरिक्त एलर्जी आणि ऑटो-इम्यूनच्या आजारांपासून ही दूर रहाता येते.

सूज येण्याच्या समस्येपासून दूर राहता
मुलेठीचे सेवन केल्याने तुम्ही सूज येण्याच्या समस्येपासून दूर राहता. शरिरात गाठी तयार होणे किंवा हृदयासंबंधित आजारापासून दूर राहता. त्याचसोबत यामध्ये असलेले अँन्टीऑक्सिडेंट फ्री रेडिकल्सचा सामना करतात आणि तुमच्या संपूर्ण शरिरात फैलाव करण्यापासू रोखतात. त्यामुळे दुखणे आणि सूजेच्या समस्येपासून दूर राहता.


हेही वाचा- सुंदर त्वचा आणि मजबूत हाडांसाठी नाभीमध्ये घाला ‘हे’ तेल

- Advertisment -

Manini