उन्हाळाचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या हे या ऋतुचे वैशिट्य आहे. उन्हाळ्यात जसेजसे तापमान वाढते तसतसे आपले शरीर डिहायड्रेट, थकलेले, चिडचिडे आणि अस्वथ्य होते. त्यामुळे उन्हाळ्यानुसार अन्नाचे सेवन केले नाही तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. यासाठी डॉक्टर कायम हंगामानुसार अन्न खाण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीराला सर्व पोषक द्रव्ये मिळण्यास मदत होते.
ताजी फळे – उन्हाळ्यात बाजारात कलिंगड मुबलक प्रमाणात असते तसेच पोषणासाठी अनेक रसाळ फळांना पसंती दिली जाते. लिंबू, द्राक्ष, आंबा, अननस, स्ट्राबेरी आणि टोमॅटोसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी, ए, बी, इ आणि के सारख्या इतर आवश्यक पोषक तत्वे असतात. व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले फळे शरीरातील हायड्रेशनची पातळी राखतात.
सोयाबीन – उन्हाळ्यात मांसाहारचे सेवन कमी करण्याचा सल्ला कायम देण्यात येतो. याउलट सोयाबीन खावे असे तज्ज्ञ सांगतात. सोयाबीन अंडी आणि मांसासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. हे आवश्यक खनिजे, प्रोटिन्स आणि बी व्हिटॅमिन समृद्ध आहे, ज्यामुळे ते आपल्यासाठी संतुलित आहार बनते.
मशरूम – बऱ्याच जणांना मशरूमच्या पौष्टीकतेच्या गुणधर्माबद्दल माहित नसते. मशरूममध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, तांबे, पोटॅशियम आणि सेलेनियम सारख्या पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते, तर कॅलरी कमी असतात. परिणामी, मशरूम त्यांच्या पौष्टिक गुणधर्मामुळे उन्हाळयाच्या आहारात मशरूमचा समावेश केल्याने आपल्याला खूप फायदा होऊ शकतो.
काकडी – उन्हाळ्यातील सुपरफूड म्हणजे काकडी. काकडी 96 % पाण्याने बनलेली आहे, ज्यामुळे ती आपले शरीर हायड्रेट ठेवते. 100 ग्रॅम काकडीमध्ये केवळ 16 कॅलरीज असतात आणि ती फायबर समृद्ध असते. उन्हाळ्यात तुम्ही डिटॉक्स पाण्यात काकडीचे तुकडे मिसळा, ते कोशिंबीरमध्ये घ्या किंवा हायड्रेटिंग फेस मास्क म्हणून देखील वापरू शकता. काकडी नेहमीच पाण्याने समृद्ध असते ज्यामुळे आपल्या शरीराला एक वेगळा ताजेपणा मिळतो.
अंजीर – अंजीर सौम्य गोड फळ उन्हाळ्यात शरीरासाठी चांगली असतात. अंजीर कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. ते हाडांसाठी चांगले असतात. त्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवतात. त्यामुळे उन्हाळ्यात अंजीर अवश्य खावेत.
हेही वाचा : नारळ पाणी, ताकच नाही तर या पेयांनी देखील उन्हाळ्यात मिळेल गारवा