Sunday, December 3, 2023
घरमानिनीHealthनवजात बाळाचा पापा घेतल्याने त्याला होऊ शकतो संसर्ग

नवजात बाळाचा पापा घेतल्याने त्याला होऊ शकतो संसर्ग

Subscribe

जेव्हा आपण एखाद्या लहान बाळाला पाहतो तेव्हा त्याचा पापा घेतला जातो. कारण ते दिसायला ऐवढे सुंदर असतात की, त्यांचा पापा घेतल्याशिवाय राहवत नाही. मात्र जेव्हा आपण असे करतो तेव्हा काही घरातील मोठी मंडळी ते करताना पाहिल्यानंतर ओरडतात. खरंतर यामागे काही कारणं असतात. अशातच वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास बाळाचा पापा घेणे धोकादायक आहे. याच बद्दल डॉक्टर काय म्हणतात ते पाहूयात. (Avoid kissing to new born baby)

बाळाचा पापा घेणे चुकीचेच
डॉक्टर असे म्हणतात की, जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते. अशातच मोठ्या मंडळींनी चुकून ही असे करु नये. असे केल्याने बाळाला इन्फेक्शन आणि काही आजार होण्याचा धोका असतो. त्याचसोबत बाळाच्या आईने सुद्धा असे करु नये.

- Advertisement -

बाळाचा पापा घेल्याने होतील ‘या’ समस्या
-श्वसनासंदर्भात धोका
बाळाची रेस्पिरेटरी सिस्टिम म्हणजेच श्वसन प्रणालीला पूर्णपणे विकसित होण्यास जवळजवळ 8 वर्ष लागतात. अशातच बाळाच्या ओठांवर किस केल्यास त्याच्या फुफ्फुसात संक्रमण होण्याची शक्यता वाढते. फुफ्फुसात संक्रमण झाल्यास बाळाला श्वसनासंबंधित समस्याचा सामना करावा लागू शकतो.

-त्वचेसंबंधित समस्या
महिला बहुतांशवेळा आपल्या त्वचेवर स्किन प्रोडक्ट्स लावतात. अशातच ब्युटी प्रोडक्ट्समध्ये वापरल्या गेलेल्या केमिकलचा संपर्क बाळाशी आल्यास तर त्याला नुकसान पोहचू शकते. तज्ञ असे म्हणतात की, लहान मुलांची त्वचा संवेदनशील असते. अशातच त्यांना रॅशेज, रेडनेस आणि खाज अशा समस्या येऊ शकतात.

- Advertisement -

-ताप येणे
ताप येणे सामान्य आजार असला तरीही बाळासाठी तो धोकादायक ठरु शकतो. जर एखाद्या वयस्कर व्यक्तिला सर्दी, खोकला किंवा संसर्गजन्य आजार झाला असेल आणि त्याने बाळाचा मुका घेतल्यास तर त्याला सुद्धा तापाचा संसर्ग होऊ शकतो.

-कॅविटी
बाळाचा पापा घेताना वयस्कर व्यक्तींची लाळ ही त्याच्या तोंडात जाऊ शकते. तज्ञ असे म्हणतात की, लाळेत असलेले स्ट्रेप्टोकोकस म्युटने नावाचा बॅक्टेरिया बाळांच्या दातात कॅविटीचे कारण ठरु शकते.


हेही वाचा- बाळाला बाहेर फिरायला नेताना घ्या ‘ही’ काळजी

- Advertisment -

Manini