घरदेश-विदेशमोदी सरकारचा एक निर्णय; अमेरिकेतील भारतीयांनी सुपरमार्केटमध्ये केली गर्दी; काय आहे कारण?

मोदी सरकारचा एक निर्णय; अमेरिकेतील भारतीयांनी सुपरमार्केटमध्ये केली गर्दी; काय आहे कारण?

Subscribe

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi Government) सरकारने देशातील तांदळाचे (Rice) वाढते भाव रोखण्यासाठी बिगर बासमती (Basmati Rice) तांदळाच्या निर्यातीवर (Rice Export) बंदी घालण्याचा निर्णय घेतला. परंतु याचे पडसाद अमेरिकेत दिसू लागले. अमेरिकेत (Americe) राहणाऱ्या भारतीयांनी बासमती तांदूळ खरेदीसाठी सुपर मार्केटमध्ये (Super Market) प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकतील भारतीय तांदळ्याच्या गोण्या खरेदी करताना आणि आपल्या गाडीत भरतानाचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (A decision of the Modi government Indians in America throng supermarkets What is the reason)

हेही वाचा – फेसबुक प्रेमाने ओलांडल्या सीमा; भारतीय तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात

- Advertisement -

नरेंद्र मोदी सरकारने देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि आगामी सणांच्या काळात किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, गैर-बासमती तांदूळ आणि बासमती तांदळाच्या निर्यात धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण तांदळाच्या 25 टक्के वाटा गैर-बासमती पांढऱ्या तांदळाचा आहे. भारताच्या या निर्णयानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी स्वत:कडे तांदळाचा जास्तीत जास्त साठा करण्यासाठी सुपरमार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. सुपरमार्केटच्या बाहेर तांदूळ खरेदीसाठी भारतीयांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये अमेरिकेतील भारतीय तांदळाच्या गोण्या खरेदी करताना आपल्या वाहनांमध्ये भरताना दिसत आहेत.

हेही वाचा – Manipur Violence : महिलांसह जमावानं रिकामी घरं आणि शाळा पेटवल्या

- Advertisement -

तांदळाचा तुटवडा निर्माण होऊन किमती वाढू शकतात

अमेरिकेत तांदूळ खरेदी करण्यासाठी होणऱ्या गर्दीचे कारण म्हणजे तेथे राहणाऱ्या एकूण लोकसंख्येमध्ये भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तेथे राहणारे भारतीय आपल्या आहारात तांदळाला जास्त महत्त्व देतात. दरम्यान, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश असल्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर तांदळाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि किमतीतही वाढ होऊ शकते. देशातील किमती कमी करण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले तरी रशियाने काळ्या समुद्रातील धान्य करार रद्द केल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -