Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthबाळाला बाहेर फिरायला नेताना घ्या 'ही' काळजी

बाळाला बाहेर फिरायला नेताना घ्या ‘ही’ काळजी

Subscribe

एखाद्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यामुळे तुमचा प्रवास अगदी आरामदायी होतो. काही वेळेस प्रवास करताना आपण बाळाला घेऊन जातो तेव्हा अधिक काळजी घ्यावी लागते.त्यामुळे नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याच बद्दल अधिक जाणून घेऊयात. (Travel with new born baby tips)

-ब्रेक घ्या 
लॉन्ग ट्रिपसाठी जात असाल तर काही अंतरावरील प्रवासानंतर थोडा वेळ ब्रेक जरुर घ्या.कारण लहान मुलांना एकाच ठिकाणी बसवून ठेवल्याने ते अधिक चिडचिड करतात. ब्रेकमध्ये जेव्हा तुम्ही मुलाला मोकळ्या हवेशीर ठिकाणी घेऊन जाता तेव्हा त्याला फ्रेश वाटेल आणि तो प्रवासादरम्यान शांत ही राहिल.

- Advertisement -

-स्टे करतेवेळी लक्ष द्या
प्रवासादरम्यान जर तुम्ही एखाद्या ठिकाणी स्टे करणार असाल तर बाळाला आवश्यक ते सर्व सामान तुमच्याजवळ ठेवा. जेणेकरुन जरी रात्री त्याला भूक लागली तर त्याला तुम्ही ते द्याल याची सुद्धा काळजी घ्या.

-बाळाच्या खाण्याकडे लक्ष द्या
जर तुमच्या बाळाला ब्रेस्टफिडिंग करायची असेल तर त्याची भूक भागवली जाऊ शकते. मात्र जर तो बॉटलमधून दूध पित असेल तर त्यासाठी उत्तम क्वालिटीची दूधाची बॉटल खरेदी करा. त्याचसोबत त्याला काय हवं नकोय ते सुद्धा पहा.

- Advertisement -

-हायजीनची काळजी घ्या
बाळाच्या हायजीनची काळजी घेतली पाहिजे. कारण त्याची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते. त्यामुळे ते लगेच आजारी पडण्याची अधिक शक्यता असते. अशातच सॅनिटाइजर, अँन्टी सेप्टिक लिक्विड, साबण अशा गोष्टी तुमच्यासोबत जरुर ठेवा.

-बाळाची वेगळी बॅग तयार करा
ऋतूनुसार बाळाच्या कपड्यांची बॅग तयार करा. प्रवासादरम्यान बाळाला कॉटनचेच कपडे घाला. त्याचसोबत त्याचे डायपर, औषधं हे सुद्धा त्याच्या बॅगेत ठेवा.


हेही वाचा- लहान मुलांना बाळगुटी का द्यावी?

- Advertisment -

Manini