Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenKitchen Hacks : उन्हाळ्यात दूध नासू नये म्हणून करा हे सोपे उपाय

Kitchen Hacks : उन्हाळ्यात दूध नासू नये म्हणून करा हे सोपे उपाय

Subscribe

उन्हाळा सुरू होताच स्वयंपाकघरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे दुध फाटणे. कधी कधी फ्रीजमध्ये ठेवलेले दूधही फाटते. अधिक तापमानामध्ये दूध टिकत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात दूध फाटण्याची समस्या अधिक दिसून येते. उन्हाळ्याच्या दिवसात दूध अधिक टिकावे म्हणून फ्रिजमध्ये स्टोअर करण्यात येते. पण फ्रिजमध्ये स्टोअर केलेले दूधही अनेकदा उकळवताना फाटते. अनेकदा बाहेर दूध राहिल्याने फाटते. मग त्याचे पनीर करणे हा एकमेव पर्याय उरतो. पण उन्हाळ्यात जर आपल्याला दूध लवकर खराब होऊ नये असे वाटत असेल तर, काही सोप्या ट्रिक्स आपल्याला मदत करतील. या ट्रिक्समुळे अति उष्णतेतही दूध चांगले टिकून राहेल आणि खराबही होणार नाही.

दूध कसे उकळवावे :

ताजे दूध तुम्ही अशा पातेल्यातून अथवा टोपातून  उकळवावे जो अत्यंत स्वच्छ असेल. पातेल्याला कुठेही जुना पदार्थ चिकटलेला नसेल अथवा भांड्यांचा साबण चुकूनही त्याला लागून राहिलेला नसेल. पातेल्यात थोडी जरी घाण असली तरीही दूध नासते अथवा फाटते.

- Advertisement -

कच्चे दूध तसेच ठेऊ नका :

कच्चे दूध खराब होत नाही म्हणून तुम्ही रूम टेम्परेचरवर तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही चूक करताय. कच्चे दूध आणल्यानंतर त्वरीत उकळवा. जेणेकरून ते खराब होणार नाही.

सोड्याचा वापर :

दूध गॅसवर ठेवताच फाटणार आहे असे वाटत असेल तर त्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाका. लक्षात ठेवा, उकळण्यास सुरुवात होण्यापूर्वी हे करणे आवश्यक आहे. हे दूध जास्त काळ स्टोअर करून ठेवू नका आणि 3-4 तासांच्या आत वापरा.

- Advertisement -

फ्रीजमध्ये ठेवताना या चुका करू नका :

दूध आम्लयुक्त गोष्टींपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ टोमॅटोचा रस, चटणी, लिंबू इत्यादी दुधाजवळ ठेवू नका. दुधाभोवती कच्चे मांस किंवा खरबूज यांसारख्या वस्तू ठेवल्याने ते खराब होते. तसेच दूध गरम करून झाल्यावर पहिले रूम टेम्परेचरवरच गार होऊ द्या. दूध नैसर्गिकरित्या थंड झाले की त्यानंतरच तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करा. गरम दूध कधीही त्वरीत फ्रिजमध्ये ठेऊ नये. दुधाचे पॅकेट खूप जमा झाले असेल तर ते फ्रीजरमध्ये ठेवा. यामुळे हे दूध तुम्ही अनेक दिवस वापरू शकता.

_____________________________________________________________________

हेही वाचा : गुढीपाडव्याला श्रीखंड का खाल्ले जाते? जाणून घ्या श्रीखंडाचा इतिहास

- Advertisment -

Manini