घरदेश-विदेशKetan Inamdar : भाजपा आमदाराचे नाराजीनाट्य; गुजरातच्या केतन इनामदार यांनी मागे घेतला...

Ketan Inamdar : भाजपा आमदाराचे नाराजीनाट्य; गुजरातच्या केतन इनामदार यांनी मागे घेतला राजीनामा

Subscribe

गुजरात : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर गुजरातमधील वडोदरा येथील सावली विधानसभेच्या भाजपा आमदाराने राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र आता आमदार केतन इनामदार यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. केतन इनामदार यांनी मध्यरात्री आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना ई-मेल द्वारे पाठवला होता. (BJP MLAs displeasure Gujarats Ketan Inamdar withdrew his resignation)

हेही वाचा – Politics : जागावाटपाबाबबत महायुतीत रस्सीखेच, त्यामुळे…; काँग्रेसच्या पाठिंब्यावर आंबेडकर स्पष्टच बोलले

- Advertisement -

आमदार केतन इनामदार यांनी राजीनामा दिल्यानंतर गांधीनगरमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या बैठकीनंतर केतन इनामदार यांनी आपला राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली. केतन इनामदार म्हणाले की, मध्यरात्री 1.30 वाजता आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना ईमेलद्वारे पाठवला होता. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीचे म्हणणे ऐकून मी राजीनामा दिला. मात्र प्रदेशाध्यक्षांसह नेत्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी माझे म्हणणे ऐकून प्रश्न सोडविले. मी माझ्या आणि माझ्या परिसरातील कामगारांच्या वेदना सर्वांना सांगितल्या. प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, संघटना मंत्र्यांसह नेत्यांनी माझे ऐकले आहे. त्यामुळे मी माझ्या राजीनामा मागे घेतला आहे.

केतन इनामदार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व करणार आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. काळजीपूर्वक विचार करून मी राजीनामा मागे घेत आहे. 2020 मध्ये मी राजीनामा दिला होता, तेव्हाही माझे मत ऐकले गेले. आज पुन्हा माझे म्हणणे ऐकून घेतले गेले. आमदार म्हणून माझी तिसरी टर्म आहे. मी 2027 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे मला माझ्या भागातील सर्व कामे 2027 पूर्वी पूर्ण करायची आहेत. आचारसंहितेमुळे माझ्या भागात काही प्रकल्प सुरू होऊ शकले नाहीत, त्यामुळे नाराजी होती. स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन माझ्या भागातील निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra : राज्य सरकारची खैरात; भाजपा-अजित पवार गटाशी संबंधित साखर कारखान्यांना 1898 कोटींचे कर्ज

‘या’ कारणाने दिला होता राजीनामा

दरम्यान, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कुलदीप सिंह राऊल यांनी भाजपाविरोधात निवडणूक लढवली होती, त्यांचा भाजपाच्या केतन इनामदार यांनी पराभव केला होता. मात्र, कुलदीप सिंह राऊल यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला असून त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी सावली मतदारसंघाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या केतन इनामदार यांनी राजीनामा सादर केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -