Saturday, April 27, 2024
घरमानिनीLate Pregnancy प्लान करताय, मग हे वाचा

Late Pregnancy प्लान करताय, मग हे वाचा

Subscribe

सध्या कामाला अधिक महत्व दिले जात असल्याने मुलं जन्माला घालण्यासाठी अधिक उशिर केला तरीही चालतो असे बहुतांशजणांचे असते. परंतु आई बनण्याचे योग्य वय हे वयाच्या ३५ वर्षापेक्षा कमी असलेले बरे. परंतु शहरातील लोकसंख्येत यासाठीचे वय चाळीशीवर येऊन पोहचले आहे. परंतु वय वाढल्यानंतर प्रेग्नेंसीचा विचार करणे थोडे मुश्किल होते. यावेळी काही समस्यांचा सामना ही करावा लागतो. त्याचसोबत मातेसह बाळावर ही परिणाम होऊ शकतो.

तज्ञ असे सांगतात की, ओवेरियन रिजर्व प्रभाविच झाल्यास लेट प्रेग्नेंसीची शक्यता अधिक वाढते. अशातच ओवेरियन रिजर्व म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे महिलांच्या लेट प्रेग्नेंसीशी जोडले गेले आहेत याच बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

Ovarian Reserve
ओवेरियन रिजर्व किंवा डिम्बग्रंथी रिजर्व एका महिलेच्या Oocytes (अंड) चे प्रमाण आणि गुणवत्ता सांगते. हे एग फर्टिलाइजेशनसाठी उपलब्ध असतात. तसेच महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी फार महत्वपूर्ण असतात. ते गर्भधारण करणे आणि सफल गर्भधारण करण्याच्या त्यांच्या क्षमतेला प्रभाविच करु शकतात. ओवेरियन रिजर्वला सर्वसामान्यपणे रक्त चाचणीच्या माध्यमातून मापले जाते. तसेच ते काही हार्मोनच्या स्तराचे आकलन करतात.

अल्ट्रासाउंड टेस्ट
अँन्टी मुलरियन हार्मोन आणि फोलिक्ल स्टिमुलेटिंग हार्मोनच्या स्तराची यावेळी चाचणी केली जाते. अल्ट्रासाउंड टेस्टच्या माध्यमातून ओवरी मध्ये फोलिक्लच्या संख्येची गणना करण्यासाठी ओवेरियन रिजर्वचा तपास केला जातो.

- Advertisement -

Egg Number
जेव्हा आपण जन्मतो तेव्हा ओवेरियन फोलिकल्सच्या रुपात १-२ मिलियन संभावित अंड्याच्या कोशिका असतात. ही संख्या वाढत्या वयासह कमी होत जाते. तरुणावस्थेत ही संख्या ३००,००० संभाव्य अंडी ऐवढे राहतात. रीप्रोडक्टिव एजच्या दरम्यान, ३००-४०० अंडेच ओवूलेट करु शकतात. ओवेरियन रिजर्स अंड्याची संख्या आणि गुणवत्तेच्या आधारावर एका महिलेला दोन अंडाशयातील प्रजनन क्षमता सांगते.कमी ओवेरियन रिजर्व झाल्यास अंड्यांची संख्या कमी किंवा गुणवत्ता खराब होते. यामुळे ओवरीत सामान्य प्रजनन क्षमतेला नुकसान पोहचते. यामुळे इम्फर्टिलिटी विकसित होते. जी लेट प्रेग्नेंसीचे कारण होते.

आरोग्यासंबंधित धोके वाढतात
लेट प्रेग्नेंसी म्हणजेच अॅडवान्स मॅटरनल एज किंवा अॅडवान्स पॅटर्नल एजच्या रुपात सुद्धा ओळखले जाते. हे ३५ किंवा त्यापेक्षा अधिक वयातील महिलांमध्ये होणाऱ्या प्रेग्नेंसीला म्हटले जाते. या प्रकरणांत ओवेरियन रिजर्वमध्ये घट झाल्याने फर्टिलिटी रेट कमी होऊ शकतो. नॅच्युरल कंन्सेप्शनची संभावना कमी होऊ शकते.

गर्भपाताची शक्यता वाढते
गर्भपात, क्रोमोसोमल अॅबनॉर्मेलिटीज सारख्या डाउन सिंड्रोम आणि गर्भावस्थेच्या जटिलतेचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त अॅडवान्स मॅटरनस एजसोबत काही आजारांचा धोका वाढतो. गर्भाव्यस्थेदरम्यान मझुमेह आणि प्रीक्लेम्पसियाची जोखिम अधिक वाढते.


हेही वाचा- वयाच्या चाळीशीनंतर ही होऊ शकता आई-बाबा

- Advertisment -

Manini