घरक्राइम"आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही", बृजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया

“आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही”, बृजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई | “आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही. मी आरोपी नाही”, गुन्हा दाखल झाल्यानंतर बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मलिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा (Sexual Abuse) आरोप केला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ( Delhi Police) बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर बृजभूषण सिंह यांनी पहिल्यांदा माध्यमांसमोर येऊन सर्व आरोप फेटाळून लावले. आणि कुस्तीपटू माझ्याविरोधात षडयंत्र रचल्या आरोप त्यांनी केला आहे.

बृजभूषण सिंह माध्यमांशी बोलताना म्हणाले, “माझा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जवळपास संपला आहे. त्यामुळे जोपर्यंत दुसऱ्या अध्यक्षची निवड होत नाही, तोपर्यंत मी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देणार नाही. यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. या तीन लोकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. राजीनामा देणे ही फार मोठी गोष्टी नाही. पण, आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही. मी आरोपी नाही, या कुस्तीपटूंच्या मागण्या सातत्याने बदलत आहेत. पहिल्यांदा कुस्तीपटूंनी आंदोलन केल्यानंतर राजीनामा देण्याची मागणी केली होती. तेव्हा मी म्हटले होते की, राजीनामा देण्याएवढी मोठी गोष्ट नाही. परंतु, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देणे म्हणजे कुस्तीपटूंनी केलेले सर्व आरोप मान्य केल्यासारखे होईल. कुस्तीपटू हे माझ्याविरोधात लोकांना भडकविण्याचे काम करत आहेत”, अशी टीका त्यांनी कुस्तीपटूंवर केली आहे.

- Advertisement -

माझा एक कुटुंब आणि एक आखाड्याला विरोध  

“पहिल्यांदा कुस्तीपटूंची मागणी होती, माझ्यावर एफआयआर दाखल व्हावी. त्यानुसार, माझ्यावर एफआयार दाखल झाली आहे. मला तुरुंगात टाकावे, माझ्याकडे असलेल्या सर्व पदाचा राजीनामा द्यावा. मी लोकसभेचा सदस्य आहे. हे पद विनेश फोगाटच्या कृपेने मला मिळाले नाही. मला लोकांनी निवडून दिले आहे. आणि मला लोकांनी एकदा नाही तर सहा वेळा निवडून दिले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष पद देखील कोणाच्या कृपेने मिळालेले नाही. मी निवडणूक लढवून जिंकलो आहे. माझा एक कुटुंब आणि एक आखाड्याला विरोध आहे. हरियाणाच्या एकाच कुटुंबातील खेळाडू का? हरियाणातील इतर खेळाडू का नाही?, असा सवाल बृजभूषण सिंह यावेळी केला आहे. बृजभूषण पुढे म्हणाले, “हिमाचल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, बंगला, आसाम देशाच्या इतर राज्यातील खेळाडू का नाही?, गेल्या १२ वर्षापासून यांच्यासोबत लौंगिक शोषण होत आहे. देशातील इतर खेळाडूंसोबत का होत नाही. एक आखाडा आणि एक कुटुंब. हरियाणातील ९० टक्के लोक माझ्यासोबत आहेत. कारण मी त्यांच्यासाठी काम केले आहे.

- Advertisement -

 

हेही वाचा – अखेर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल; पॉस्कोसह अन्य कलमे लावली

दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषणवर गुन्हा नोंदविला

बृजभूषण सिंह यांच्यावर शुक्रवारी रात्री दिल्ली पोलिसांनी पॉस्कोसह विविध कलमे लावत गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांच्याविरोधात सात महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे बृजभूषण सिंहांवर गुन्हा नोंदवणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंहांवर गुन्हा नोंदवला.

हेही वाचा – बृजभूषण सिंह विरोधात आजच दाखल होणार गुन्हा; दिल्ली पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात माहिती

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -