Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthLotus Birth म्हणजे नक्की काय?

Lotus Birth म्हणजे नक्की काय?

Subscribe

डिलिवरीच्या दोन पद्धती असतात. एक नॉर्मल आणि एक सिजेरियन. मात्र वेळेसह डिलिव्हरीच्या पद्धतीत खुप बदल झाला आहे. सध्या बहुतांश महिला वॉटर बर्थचा ऑप्शन निवडतात. अशातच आणखी एक नवी प्रक्रिया ज्यामध्ये जन्मानंतर प्लेसेंटा आणि ‘अंबिलिकल कॉर्ड’ म्हणजेच नाळ ही बाळापासून वेगळी केली जात नाही. ती आपोआप वेगळी होईल याची वाट पाहिली जाते. या प्रोसेसलाच ‘लोटस बर्थ’ असे म्हटले जाते. परंतु अंबिलिकल कॉर्डला वेगळे होण्यासाठी काही दिवस आणि आठवडे लागू शकतात. लोटस बर्थ संदर्भात सर्वांचे आपले आपले मत आहेत. काही लोक याला फायदेशीर मानले जातात. तर काहीजण याला आई आणि बाळासाठी रिस्की असल्याचे मानतात. तर जाणून घेऊयात लोटस बर्थचे फायदे आणि तोटे.

लोटस बर्थ खरंच सुरक्षित आहे का?
लोटस बर्थ संदर्भात अधिक रिसर्च झालेला नाही. त्यामुळे याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. बाळाच्या जन्मानंतर प्लेसेंटा म्हणजे नाळ याचे काहीच काम नसते. यामुळे याच्या माध्यमातून संक्रमण होण्याचा धोका असू शकतो. जे बाळाला सुद्धा होऊ शकते. लोटस बर्थ प्रकरणी वैद्यकिय पुरावे नसल्याने ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे म्हटले जाऊ शकते.

- Advertisement -

लोटस बर्थचे फायदे
लोटस बर्थचे फायदे वैज्ञानिक रुपात सिद्ध झालेले नाहीत. मात्र काही फायदे असे आहेत जे महिलांना होऊ शकतात.

- Advertisement -

-लोटस बर्थमुळे नवजात बाळाला शांत वाटू शकते
-आई आणि बाळाला ब्रेस्ट फिडिंगचा उत्तम अनुभव अनुभवता येतो
-प्लेसेंटाचा अधिक वेळ जोडला राहिल्याने आई आणि बाळामध्ये उत्तम संबंध निर्माण होऊ शकतात
-नवजात बाळाला एनिमियापासून दूर राहण्यास मदत मिळू शकते

तोटे काय आहेत
लोटस बर्थमध्ये जोखिम अधिक असते त्यामुळे डॉक्टर ते न करण्याचा सल्ला देतात.
-ओल्फलाइटिस, नवजात बाळात अंबिलिकल कॉर्ड आणि त्याच्या आसपासच्या टिश्यूला संक्रमित करू शकतात
-जन्मानंतर बाळाला हेपेटाइटिस होऊ शकतो
-जर बाळ प्री-मॅच्युअर असेल तर त्याला एनआयसीयूमध्ये ठेवले जाते. अशातच लोटस बर्थ शक्य नाही
-अंबेलिकल कॉर्डच्या जवळ खाज, सूज किंवा खेचल्यासारखी समस्या होऊ शकतो. हे आई आणि बाळासाठी धोकादायक ठरु शकते


हेही वाचा- ब्रेस्टफिडींग बाळाबरोबरच आईसाठीही आहे फायदेशीर

- Advertisment -

Manini