घरमहाराष्ट्रGaneshotsav 2023 : POPच्या गणेशमूर्तींना परवानगी, पण..., 'हे' आहे बंधन

Ganeshotsav 2023 : POPच्या गणेशमूर्तींना परवानगी, पण…, ‘हे’ आहे बंधन

Subscribe

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी (Ganesh Chaturthi) अवघा काही महिन्यांचा अवधी असताना गणेश भक्तांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ला पर्याय सुचवण्याबाबत गाईडलाइन अद्याप जाहीर झाल्या नसल्याने यंदा POP च्या गणेशमूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र कमी उंचीच्या मुर्तींसाठी शाडू माती बंधनकारक करण्यात आली आहे. (Ganeshotsav 2023 POPs Ganesha idols allowed but this is a rule)

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ला पर्याय सुचवण्याबाबत गाईडलाइन जारी करण्यात येणार होत्या. मात्र मंडळाने अद्यापही गाई़डलाइन जाहीर झाली नसल्यानं मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वर्षी पीओपीच्या चार फुटांवरील गणेशमूर्त्या वापरता येणार आहे. मात्र चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या मुर्तींसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवाला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेत्यांसाठी आजपासून ‘एक खिडकी’ पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bus Accident : विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातप्रकरणी मोठी अपडेट; ड्रायव्हरसंबंधी धक्कादायक माहिती समोर

महापालिकेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार

पोओपीच्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांसमोर उंच गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सरकारकडे ‘पीओपी’ला पर्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे जरी मार्गदर्शक सुट्ट्या जारी केल्या, तरी या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं आणि सरसकट करता येणार नसल्याचं मूर्तिकारांचं म्हणणं आहे. दरम्यान, गणेशोत्सव तोंडावर आला असून महापालिकेच्या परवानग्या मिळवण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. तसेच यंदा महापालिकेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दोन्ही भावांमध्ये मध्यस्थीची गरज नाही; मनसेशी युतीबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले

ऑनलाइन अर्ज करताना मंडप परवानगीसाठी मूर्तिकार, मूर्ती साठवणुकदारांना अर्जासह स्वतःच्या आधार कार्डाची स्वयंसाक्षांकीत प्रत जोडावी लागणार आहे. त्याशिवाय त्यांनी हमीपत्र देणे बंधनकारक असणार आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन प्रणालीतून हमीपत्र डाऊनलोड करावे लागेल आणि त्यावर संबंधितांनी स्वाक्षरी करून अर्जासह अपलोड करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. गणेश मूर्तिकारांनी मागील वर्षी दिलेल्या मंडप परवानगीचा क्रमांकही अर्जामध्ये नमूद करावा. तसेच ज्या मूर्तिकारांनी यापूर्वी विभाग कार्यालयात असंगणकीय पद्धतीने (ऑफलाईन) अर्ज केला होता, त्यांनी त्याची प्रत संगणकीय अर्जासह सादर करावी, असेही आवाहन महानगरपालिकेने केले आहे. ही ऑनलाईन सुविधा मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर आजपासून सुरू झाली आहे. मंडळांना 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत सायंकाळी 5.30 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -