घरलाईफस्टाईलदेशी टोमॅटो आणि हायब्रीड टोमॅटोमध्ये काय आहे फरक ?

देशी टोमॅटो आणि हायब्रीड टोमॅटोमध्ये काय आहे फरक ?

Subscribe

अनेक भाज्यांमध्ये टोमॅटो सर्रास आणि आवर्जून वापरला जातो. अशातच भाज्यांचा राजा असं देखील टोमॅटोला म्हंटल जात. तसेच तुम्हाला माहिती आहे का ? देशी टोमॅटो आणि हायब्रीड टोमॅटो मधला नेमका फरक काय आहे. विशेष म्हणजे टोमॅटोचा वापर सॅलड ते सूपमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच भारतात टोमॅटोचे दोन प्रकार उपलब्ध आहेत. अशातच बाजारातून घरी आणलेला टोमॅटो देशी आहे की हायब्रीड आहे हे ‘या’ टिप्सच्या मदतीने जाणून घेऊया.

देशी टोमॅटो 

देशी टोमॅटो हे दिसायला गोलाकार आणि रसाळ असतात. यासोबतच देशी टोमॅटो खायला चविष्ट आणि पौष्टिक असतात. देशी टोमॅटोची चव थोडी आंबट असते. त्याचा रंग डार्क लाल नसून हलका हिरवा आणि हलका पिवळा आहे. पण तुम्हाला दिसेल की देशी टोमॅटो वरून कच्चा आहे. अशातच प्रत्यक्षात तो आतून पिकलेला असतो.

- Advertisement -

Tomatoes varieties | Enza Zaden

हायब्रीड टोमॅटो

हायब्रीड टोमॅटो हे टोमॅटो चमकदार लाल आणि टणक असतात. यांना हातात घेतल्यावर असे वाटते त्यांचामध्ये रस नाही आहे. या टोमॅटोची चवही अतिशय साधी असते. अशातच यामुळे ते बराच काळ टिकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, हे टोमॅटो आपल्यासाठी हानिकारक आहेत. कारण या टोमॅटोच्या वाढीसाठी सर्व प्रकारची केमिकल औषधे वापरली जातात.

- Advertisement -

देशी टोमॅटो आणि हायब्रीड टोमॅटोमधला फरक पुढीलप्रमाणे

  • देशी टोमॅटोला बाजारात मोठी मागणी आहे.
  • हायब्रीड टोमॅटोपेक्षा देशी टोमॅटोला बाजारात जास्त मागणी आहे.
  • तुम्ही भाजीमध्ये देशी टोमॅटो टाका आणि तो हायब्रीड टोमॅटोपेक्षा जास्त चव देईल.
  • दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे, देशी टोमॅटो आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
  • तर, हायब्रीड टोमॅटो तुम्हाला आजारी बनवतात.
  • यामुळेच डॉक्टर देशी आणि सेंद्रिय टोमॅटो खाण्याचा सल्ला देतात.

12 Types of Tomatoes - Different Tomato Varieties

  • देशी टोमॅटोमध्येही 6 जाती आढळतात.
  • हायब्रीड टोमॅटोपेक्षा देशी टोमॅटो सर्वात स्वस्त आहे.
  • वास्तविक, देशी टोमॅटो फक्त भारतातच पिकवले जातात.
  • बहुतेक मंडईंमध्ये, देशी टोमॅटो फक्त स्थानिक असतात, त्यामुळे त्यांची किंमत कमी असते.
  • तर, हायब्रीड टोमॅटो हे बाहेरून आयात केले जातात, त्यामुळे ते महाग असतात.

हेही वाचा : ‘या’ भाज्यांचे सेवन केल्याने हृदय राहील निरोगी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -