Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenNavratri 2023 : उपवासात बनवा वरईचे आप्पे

Navratri 2023 : उपवासात बनवा वरईचे आप्पे

Subscribe

लवकरच शारदीय नवरात्र सुरु होणार आहे. नवरात्रीचे 9 दिवस देवीची पूजा-आराधनेसोबतच उपवास देखील केला जातो. या काळात काहीजण निर्जळी उपवास करतात तर काही खाऊन पिऊन उपवास करतात. नवरात्रीत नऊ दिवस उपवास असल्यामुळे आपल्याला वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात. त्यामुळे आज आपण खास उपवासासाठी वरईचे आप्पे कसे करतात ते पाहणार आहोत. 

साहित्य : 

  • 1 कप वरई
  • पाव कप साबुदाणा
  • 3 कप दही
  • जिरे
  • मीठ
  • हिरव्या मिरचाच ठेचा

कृती : 

Navratri fasting special recipe Varai Appe

  • सर्वप्रथम साबुदाणा मिक्सरला दळून घ्यायचा. दळून झाल्यानंतर त्यामध्ये वरई घालून पुन्हा मिक्सरला एकदा फिरवून घ्यावे.
  • मग साबुदाणा आणि वरई मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
  • मग त्यामध्ये एक चमचा जिरे, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर मिश्रणात थोडं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं.
  • अशा प्रकारे तुम्ही उपवासाच्या आप्प्यांचे पीठ तयार करा. (टिप – पीठ जास्त पातळं आणि जास्त घट्ट नको) आप्प्यांचं पीठ तयार झाल्यानंतर ते 15-20 मिनिटं झाकून बाजूला ठेवून द्यायचे.
  • त्यानंतर आप्पे पात्र गरम करून त्यामध्ये तेल सोडा आणि जे बॅटर तयार करून घेतलं आहेत ते आप्पे पात्रात घाला.
  • मग झाकणं ठेवून ते 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचे आणि पुन्हा त्यात तेल सोडून दोन्ही बाजूने नीट भाजून घ्यायचे.
  • अशा प्रकारे तुमचे उपवासाचे आप्पे तयार सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा : Navratri 2023 : नवरात्रीत उपवासाला कोणकोणते पदार्थ खाऊ शकता?

- Advertisment -

Manini