घरमहाराष्ट्रगौतमी पाटीलचा धडा शिकवायचा का मुलांना? शाळा दत्तक योजनेवर शरद पवारांचा सरकारवर...

गौतमी पाटीलचा धडा शिकवायचा का मुलांना? शाळा दत्तक योजनेवर शरद पवारांचा सरकारवर निशाणा

Subscribe

अकोला : शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी राज्य सरकारकडून ‘दत्तक योजना’ राबवली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देणगीदाराने सुचवलेले नाव संबंधित सरकारी शाळेला देता येणार आहे. देणगीदाराने शाळेला नवीन नाव दिल्यास सध्याचे नाव सदर नावाच्या पूर्वी किंवा नंतर लावता येईल, असे शासन निर्णयात राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधताना गौतमी पाटीलचा उल्लेख केला आहे. (Should Gautami Patils lesson be taught to the children Sharad Pawar targets government on school adoption scheme)

हेही वाचा – Future Chief Minister : ‘2024 ला देवेंद्र…’, बावनकुळेंच्या वक्तव्याने अजित पवार गटात खळबळ

- Advertisement -

अकोल्यातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, नाशिकमध्ये द्राक्षाचं मोठं पीक निघतं. द्राक्षापासून तिथे दारूही तयार केली जाते. मद्य तयार करणाऱ्या एका कारखान्याला राज्य सरकारने एक सरकारी शाळा दत्तक म्हणून दिली आहे. शाळा कशी चालते आहे, याची मी माहिती घेतली. पण मला असं कळलं की ज्यांना ही शाळा चालवायला दिली आहे, त्यांनी गेल्या महिन्यात त्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित केला असे म्हणत त्यांनी गौतमी पाटीलचा उल्लेख केला.

हेही वाचा – पहाटेचा शपथविधी, 2 जुलैचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

- Advertisement -

गौतमीचा धडा शिकवायचा का मुलांना?

शरद पवार यांनी उपस्थितांना विचारले की, तो कार्यक्रम कुणाचा होता? तुम्हाला नाव माहिती आहे की नाही. गौतमी पाटील, ना ऐकलंय का? गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम त्या शाळेत ठेवला होता. आता तुम्ही सांगा, मुलांना काय शिकवायचं? गौतमीचा धडा शिकवायचा का मुलांना? आपण काय करतो आहे? कशा पद्धतीने करतो आहे? कुणासाठी करतो आहे? मुलांवर आपण काय संस्कार करतो आहे? याचा विचार त्यांच्या मनात नाही. खासगीकरण केलं जात आहे थेट, असे म्हणत शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यांनी असेही म्हटले की, डॉ. पंजाबरावांनी ज्या प्रकारे शैक्षणिक संस्था उभ्या करून एक वेगळं चित्र समाजात तयार केलं. हा आदर्श कुठे आणि गौतमी पाटीलला नृत्यासाठी बोलवणारे, शाळा चालवणारे हे लोक कुठे, याचा विचार करायला पाहिजे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -