Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship ऑफिसमधील टॉक्सिक वातावरणापासून असे रहा दूर

ऑफिसमधील टॉक्सिक वातावरणापासून असे रहा दूर

Subscribe

वर्कप्लेसवर वाढत्या टॉक्सिक वातावरणाचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अशातच तुम्ही कधीकधी हातातील नोकरी सोडण्याचा विचार करता. एखाद्या समस्येपासून दूर पळणे हा काही उपाय नाही. मात्र त्यापासून कसे दूर राहता येईल याचा विचार केला पाहिजे. यासाठी तुमचे डोके शांत असणे सर्वात महत्त्वाचे आहे.

-ऑफिसमधून ब्रेक घ्या
जर तुमच्या ऑफिसचे वातावरण टॉक्सिक आहे, तर वेळोवेळी ब्रेक घ्या. प्रयत्न करा की, ऑफिसनंतर त्यासंबंधित कोणतीही कामे करू नका. जर तुम्ही ऑफिसनंतर काम करत असाल तर समस्या होऊ शकते.

- Advertisement -

-ऑफिसमधील लोकांशी अधिक मैत्री करू नका
काही वेळेस आपण ऑफिस मधील लोकांसोबत फार फ्रेंन्डली वागतो. अशातच तो तुम्हाला काही म्हणाला तर तुम्हाला वाईट वाटते. ऑफिसचे मित्र कधीच सच्चे दोस्त नसतात असे बहुतांशजणांनी सुद्धा मान्य केले आहे. या व्यतिरिक्त गॉसिपिंग करणे सुद्धा टाळा.

How To Cope With A Toxic Work Environment

- Advertisement -

-टॉक्सिक बॉसशी बोला
टॉक्सिक बॉससी बोलले पाहिजे की, तुम्हाला ऑफिसमधील वातावरण पटत नाही. हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी ठिक नसल्याचे ही सांगा. या कारणास्तव तुमचे कामात मन ही लागत नाही असे सांगा. मात्र यावेळी आपला आवाज आणि शब्दांची निवड योग्य करा.

-सेल्फ केअर गरजेची
ऑफिसमध्ये आपण दिवसभरातील खुप वेळ घालवतो. अशातच बॉस टॉक्सिक असेल तर मनात निगेटिव्हिटी येऊ लागते. निगेटिव्हिटी ही आपल्यासाठी उत्तम नाही. यामुळे सेल्फ केअर करणे गरजेचे आहे.


हेही वाचा- घरी आलेल्या पाहुण्यांचा स्वभाव असा ओळखा

- Advertisment -

Manini