जर का तुम्हाला फ्लॉवर खायला आवडत असेल, तर तुम्ही ते घरच्या पिशवीत कोणत्याही भांड्यात फ्लॉवर वाढवू शकता. आपण फ्लॉवरच्या बिया आपल्या घराच्या गॅलरीत मोठ्या आकाराच्या कुंडीत किंवा कोणत्याही मोठ्या भांड्यात लावू शकता. अशातच फ्लॉवर वाढवण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. तसेच आता आपण पाहूया घरच्या घरी कसा फ्लॉवर आपण वाढवू शकतो.
फ्लॉवरच्या बिया कधी पेरल्या पाहिजेत?
फ्लॉवरची पेरणी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सप्टेंबरपर्यंत करावी. तसेच फ्लॉवरच्या बिया नेहमी शेतात पेरल्या पाहिजेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही. तुम्ही त्याच्या बिया वाढलेल्या पिशव्या किंवा भांडीमध्ये पेरू शकता. फुलकोबीच्या बिया पेरण्यासाठी सर्वप्रथम जमीन सुपीक आहे का हे तपासून घ्यावे.
कुंडीत फ्लॉवरच्या बिया ‘अशा’ लावा
- फ्लॉवरच्या बिया बागेत लावण्यापूर्वी हे लक्षात ठेवावे की बिया बागेत पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी ठेवा.
- कारण फ्लॉवरच्या बियांना दररोज किमान ५ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळायला हवा.
- यानंतर कुंडीतली माती ५ ते १० इंच खोदून त्यात फ्लॉवरच्या बिया टाका.दर 15 दिवसांनी या कुंडीतल्या मातीला वर खाली करा. त्यामुळे त्याला हवा लागेल.फ्लॉवरला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे त्यात एक कपपेक्षा जास्त पाणी घालू नका.
फुलकोबीच्या बिया भांड्यात किंवा पिशव्यामध्ये ठेवण्यापूर्वी काय करावे?
- जमिनीत बिया टाकण्यापूर्वी शेण, वाळू आणि कडुलिंबाची पेंड टाकून माती मिसळावी लागते जेणेकरून सर्व पोषकतत्त्वे मातीतच मिसळतील.
- सर्वप्रथम,या बिया बी-ग्रो बॅगमध्ये भरून ठेवा. जेव्हा तुम्हाला फ्लॉवरच लावायचा असेल तेव्हा 3 कप जुने शेणखत घाला.
- नंतर त्यात 20 ते 50 ग्रॅम पेंड आणि 1 कप वाळू घाला. यानंतर स्प्रे बॉटलमधून थोडे पाणी शिंपडा.
- अशा प्रकारे सर्व गोष्टी झाल्यानंतर, माती व्यवस्थित मिसळा.
- तुम्ही तयार केलेल्या जमिनीत फ्लावरच्या बिया लावू शकता आणि तुम्हाला ते महिन्या भरातच वाढलेलले दिसेल.
_________________________________________________________________________
हेही वाचा : ‘या’ फळांपेक्षा त्यांच्या सालींमध्ये असते जास्त जीवनसत्व