लग्नापूर्वी काउंसिलिंग करावे का? वाचा काय म्हणतात तज्ञ

चंदा मांडवकर : 

 

लग्न करणे हा आयुष्यातील सर्वाधिक महत्वाच्या निर्णयांपैकी एक आहे. कारण यामध्ये जर चुक झाल्यास तर त्याचा पश्चाताप आयुष्यभर होत राहतो. आजच्या काळातील तरुण पिढी ही लग्न करण्याबद्दल विचार करतात. भले त्यांचे आई-वडिल त्यांना त्यांचा लाइफ पार्टनर निवडण्याची मुभा देतात पण अखेर निर्णय ज्याला लग्न करायचे आहे तोच घेतो. लोक आता शारिरीक व्यतिरिक्त मानसिक दृष्टीकोनातून लग्नाबद्दल विचार करतात. जेणेकरुन येणाऱ्या परिस्थितींबद्दल ते ठामपणे सामोरे जाऊ शकतील. ज्या प्रकारे समाज आणि तरुणाईने प्रगती केली आहे त्याच प्रमाणे लग्नाबद्दलचे ही विचार बदलले गेले आहेत. लग्नापूर्वी लोक एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. यापैकीच एक म्हणजे प्री-मॅरेज काउंसिलिंग. थोडक्यात लग्नापूर्वी त्या संबंधित काउंसिलिंग करणे.

बदलत्या काळानुसार प्री-मॅरेज काउंसिलिंग बद्दल लोक काउंसिलर सोबत आपल्या पार्टनर आणि येणाऱ्या स्थितींबद्दल प्रश्न विचारतात किंवा त्यांच्याशी त्या बद्दल चर्चा करतात. यामागील प्रमुख उद्देश असा की, लग्न करण्यापूर्वी दोन्ही पार्टनरने एकमेकांना समजून घेणे.

प्री-मॅरेज काउंसिलिंग म्हणजे काय ? ही एक प्रकारची थेरपी आहे. ज्या मध्ये लग्नाबद्दलचा निर्णय घेतल्यानंतर तरुणांना यानंतर होणाऱ्या समस्यांवर चर्चा केली जाते. तसेच पैसे ते मुल जन्माला आल्यानंतर स्थिती कशी असेल याबद्दल ही बोलले जाते. यामध्ये एकमेकांचे वागणे, पार्टनर बद्दलच्या काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. काउंसिलरच्या मदतीने तुम्ही तुमच्यातील न्यूनगंड दूर करत लग्नात येणाऱ्या समस्यांपासून दूर राहू शकता. तज्ञांच्या मते, या थेरपीमुळे तुम्ही वैवाहिक आयुष्यात सुखी राहू शकता.

कोणत्या प्रकारची प्रकरण यामध्ये अधिक?

  • What Is Pre-Marriage Counseling? - Sherman Counselingकपल्सचे एकमेकांसोबतचे संबंध
  • आयुष्य जगण्याबद्दलची मतं
  • सासु-सासरे किंवा नातेवाईकांसोबत होणारी समस्या विवाहबाह्य संबंध
  • मुलांसंदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी

या व्यतिरिक्त सध्याच्या कपल्समध्ये एकमेकांना वेळ न देऊ करणे, सोशल मीडियात अधिक वेळ अॅक्टिव्ह राहणे, एकमेकांना भावनात्मक रुपात न ओळखणे. अशी प्रकरणे प्री-मॅरेज काउंसिलिंगमध्ये खुप दिसतात.

प्री-मॅरेज काउंसिलिंगचे फायदे 

दोघांमध्ये उत्तम संवाद कायम राहतो काही वेळेस आपल्याला असलेल्या समस्या किंवा त्रासामुळे अधिक उघडपणे बोलत नाहीत. परंतु तुम्ही काउंसिलर किंवा थेरपिस्टच्या मदतीने एकमेकांसोबत उघडपणे बोलू शकतात. काउंसिलरच्या माध्यमातून तुम्ही आपल्या पार्टनरला जे काही आहे ते स्पष्टपणे सांगू शकता. याचा फायदा वैवाहिक आयुष्यात जरुर होतो.

समस्यांवर तोडगा काढण्यासाठी होते मदत

Pre Marriage Counseling - Howale Hospital

काही वेळेस एक नाते केवळ अशा कारणास्तव तुटले जाते कारण तेथे समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी आपल्या समस्यांवरच अधिक लक्ष दिले जाते. आपली चुक मान्य करण्यास घाबरता. अशातच काउंसिलर तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगतात. जेणेकरुन तुमच्या नात्यात भांडण कमी आणि आनंद राहिल.

सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करतात

Benefits of Pre-Marriage Counselling - Sanjay Kapoor Family Counselling

काही कपल्स आपल्या नात्यात असलेल्या कमतरतेबद्दलच बोलतात. वेळोवेळी तक्रार करत राहतात की, तुझे वागणे असेच आहे, तू असाच आहे. पण प्री-मॅरेज काउंसिलिंगमध्ये तुम्हाला सकारात्मकतेने विचार करण्यास शिकवले जाते. जेणेकरुन तुम्ही सकारात्मक गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रीत करु शकता.

आक्रमक वागणे दूर करण्यास मदत होते

Premarital Counseling: What to Expect and More

मदत नात्यात काही वेळेस अशा गोष्टी घडतात की, त्या कारणामुळे स्थिती बिघडते. नात्यात वारंवार वाद होत राहतात. नवऱ्याच्या अथवा बायकोच्या संतप्त वागण्यामुळे ही काहीजण एकमेकांपासून दूर जाण्याचा विचार करतात. अशातच वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होते. पण प्री-मॅरेज काउंसिलिंगच्या मदतीने तरुण मंडळी मात्र त्यांच्या आक्रमक वागण्यावर नियंत्रण मिळवू शतात. आपल्यातील उणीवा कमी करु शकतात.

निर्णय घेण्याची क्षमता वाढते

11 Divorce-Proof Reasons To Get Thee To Premarital Counseling Stat | Dr.  Jed Diamond | YourTango

काउंसिलिंगच्या मदतीने पार्टनरमध्ये निर्णय घेण्याची क्षमता ही वाढते. जसे की, लग्न, पैसे आणि मुलांबद्दल तुमचे निर्णय तुम्ही घेण्यास सक्षम होता. एकमेकांसोबत नेहमीच आपुलकीने वागता. उघडपणे एकमेकांशी बोलू शकता. कोणत्याही स्थितीत महत्वाचा निर्णय घेताना पार्टनर असणे का गरजेचे असते हे सुद्धा कळते.

दरम्यान, लग्नापूर्वी प्री-मॅरेज काउंसिलिंगच्या मदतीने तुम्हाला पार्टनरला समजून घेता येतेच. पण त्याचसोबत त्यांचा विश्वास, मुल्य, अपेक्षा, प्राथमिकता अथवा त्यांचे डेली रुटीन कसे असते हे सुद्धा सहज कळते.


हेही वाचा :

मुलांना मराठी की इंग्लिश शाळेत टाकायचं? कळतं नाहीये? मग वाचा