Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRecipe : उन्हाळ्यात बनवा खजूराचे लोणचे

Recipe : उन्हाळ्यात बनवा खजूराचे लोणचे

Subscribe

आतापर्यंत तुम्ही कैरी, लिंबू , मिरची, आवळा यांपासून बनलेले प्रत्येक प्रकारचं लोणचे खाऊन पाहिले असेल. परंतु तुम्ही यावेळी खजूरचे लोणचे नक्की ट्राय करा.

साहित्य :

  • 300 ग्राम खजूर
  • 1 चमचा लाल मिरची पाउडर
  • 3 चमचा धने पाउडर
  • 3 चमचा बडीशेप पाउडर
  • 3 चमचा जीरे पाउडर
  • 1 कप लिंबाचा रस
  • मीठ चवीप्रमाणे

कृती :

  • सर्वप्रथम खजूर लोणचे बनवण्यासाठी मंद आचेवर एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
  • पाणी गरम होताच यामध्ये खजूर टाकून ते उकळून घ्या. जेव्हा खजूर नरम होतील तेव्हा, त्याच्या बिया काढा.
  • आता एका वाटीत खजूर , लाल मिरची पाउडर , बडीशेप पाउडर, जीरे पाउडर एकत्र करून घ्या आणि एका भरणीमध्ये भरून ठेवा.
  • एका वाटीत लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून ठेवा आणि खजूरच्या मिश्रणावर टाका. मात्र यात खजूर जेवढे भिजेल, तेवढाच लिंबाचा रस घ्या.
  • खजूर लोणचे तयार झाले. आता लोंच्याच्या भरणीला 7-8 दिवसापर्यंत थोड-थोड हलवत रहा. ज्यामुळे लोणचे चांगले एकजीव होईल.
  • एका आठवड्यानंतर खजूर लोणचे खाण्यासाठी तयार होईल.

हेही वाचा : Veg Lollipop : टेस्टी व्हेजिटेबल लॉलीपॉप

- Advertisment -

Manini