घरमहाराष्ट्रMumbai : 'राजकारणाला सुसंस्कृतपणाचे धडे देण्याची गरज'; शिक्षक भारतीच्या शिक्षकांचा ठाकरे गटात...

Mumbai : ‘राजकारणाला सुसंस्कृतपणाचे धडे देण्याची गरज’; शिक्षक भारतीच्या शिक्षकांचा ठाकरे गटात प्रवेश

Subscribe

मुंबई: शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर जालिंदर सरोदे आपले समर्थक शिक्षक भारतीचे शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षकांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले आणि सध्या सध्याच्या राजकारणाला सुसंस्कृतपणाचा धडा देण्याची गरज असल्याचं म्हणत भाजपावर टीकास्त्र डागलं आहे. (Mumbai Current politics need to be taught a lesson in civility Uddhav Thackeray s criticism of Shikshakar Bharati during his entry into the Shikshakar Party)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागत करत भाजपावर टीकास्त्र डागलं. सध्या जे राजकारण सुरू आहे. त्या राजकारणाला सुसंस्कृतपणाचे धडे देण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच, यावेळी अब की बार, मोदी सरकार तडीपार..असा नाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

अंतर्गत नाराजीमुळे पक्षप्रवेश 

शिक्षक भारतीमधील अंतर्गत नाराजी आणि मुंबई शिक्षत मतदार संघाची उमेदवारी डावलल्याने जालिंदर सरोदे हे नाराज होते आणि त्यामुळेच शिक्षक भरती सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत असल्याची माहिती आहे. जालिंदर सरोदे हे मागील 18 वर्षांपासून शित्रक भरतीच्या स्थापनेपासून कार्यरत होते आणि कपिल पाटील यांचे विश्वासू म्हणून ते समजले जातात.

शिवसेना ठाकरे गटात शिवसेना शिक्षक सेनेची त्यांनी मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जेडीला रामराम केल्यानंतर आणि समाजवादी गणराज्य पक्ष या नव्या पक्षाची स्थापन केल्यानंतर आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानंतरदेखील आपलेच सहकारी हे शिवसेना ठाकरे गटासोबत जात आहेत.

- Advertisement -

(हेही वाचा: Nitin Gadkari : गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर…, ठाकरे गटाचे फडणवीसांवर शरसंधान)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -