Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : शिळ्या पोळीपासून बनवा टेस्टी मसाला पोळी

Recipe : शिळ्या पोळीपासून बनवा टेस्टी मसाला पोळी

Subscribe

अनेकदा रात्रीची शिळी पोळी शिल्लक राहिली की ती वाया जाते. अशावेळी तुम्ही शिळ्या पोळीची मसाला पोळी करुन तुमच्या सकाळच्या नाश्त्याची सोय करु शकता.

साहित्य :

  • शिळी पोळी
  • कांदा
  • टॉमेटो
  • चिरलेली कोथिंबीर
  • तिखट
  • चाट मसाला
  • चवीपुरते मीठ
  • बटर

कृती :

Kadak Rumali Roti | Simple and easy Kadak Rumali Roti at home | Crispy Rumali Roti | Vismai Food

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम चिरलेला कांदा, टॉमेटो, कोथिंबीर एकत्र करुन त्यावर चाट पावडर, मीठ आणि तिखट करून नीट मिक्स करून एकत्र करून घ्या.
  • नंतर शिळी पोळी तुम्ही तव्यावर बटर सोडून थोडी पापडाप्रमाणे कडक भाजून घ्या.
  • नंतर ती खाली उतरवल्यावर वर तयार केलेले मिश्रण त्यावर घाला.
  • तयार मसाला पोळीचा गरमागरम चहासोबत आस्वाद घ्या.

हेही वाचा :

Recipe : ज्वारीची हेल्दी इडली

- Advertisment -

Manini