घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : पक्षाची शिस्त महत्त्वाची; नाराजीच्या चर्चांवर काय म्हणाल्या...

Lok Sabha Election 2024 : पक्षाची शिस्त महत्त्वाची; नाराजीच्या चर्चांवर काय म्हणाल्या वर्षा गायकवाड

Subscribe

Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मात्र या जागावाटपावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड या मुंबईतील लोकसभेचा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आग्रही होत्या.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मात्र या जागावाटपावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड या मुंबईतील लोकसभेचा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आग्रही होत्या. पण मविआच्या जागावाटपावेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यावरून वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार होत्या. मात्र नाराजीवर वर्षा गायकवाड यांनी प्रथमच भाष्य करत मी नाराज असल्याच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024 Party discipline important says congress leader Varsha Gaikwad)

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी वर्षा गायकवाड या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या, त्या चर्चांना त्यांनी पुर्णविराम दिला. त्यानुसार, “मुंबईत काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत असल्यानेच काँग्रेस आघाडीने याआधी सहाही मतदारसंघात विजय मिळावलेला होता आणि त्यात काँग्रेसच्या पाच व राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा होती. यावेळी महाविकास आघाडी म्हणून जागा वाटपात मुंबई काँग्रेसने तीन मतदारसंघाची मागणी केली होती पण दोनच मतदारसंघ मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये खंत आहे. विषेशतः मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत म्हणून कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे परंतु पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आदर आहे. मोदींच्या हुकूमशाही राजवटीला पराभूत करून जनतेचे राज्य आणणे हेच मविआचे लक्ष्य असून पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता या नात्याने मुंबईतील सहाही जागांवर विजयी मिळवण्यासाठी काम करु”, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Congress : विजय वडेट्टीवारांचा लवकरच काँग्रेसला रामराम; महायुती सरकारमधील मंत्र्याचा गौप्यस्फोट

याशिवाय, “मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या त्यात काहीही तथ्य नाही. जिथे पक्षाची ताकत आहे, ती जागा आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असते आणि त्यात काहीही चुकीचे नाही. काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाही आहे व मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्या पक्षश्रेष्ठी समोर आपले मत मांडत असतो. मुंबई काँग्रेसची अध्यक्षा म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठीसमोर मांडल्या, तो माझ्या कर्तव्याचा भागच आहे. मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ती आहे, काँग्रेसचा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता पक्षाचा शिष्टाचार मानतो. पक्षाने एकदा भूमिका घेतली की पक्षाचे काम करणे ही माझी आणि माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार केलेला आहे आणि येणाऱ्या काळात मुंबई काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला दिसेल. पक्षाची शिस्त आणि विचारधारा हे आमच्यासाठी महत्वाचे आहे”, असेही वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : काँग्रेसला आणखी एक धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपात प्रवेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -