घरदेश-विदेशLok Sabha 2024 : निवडणुकांमध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय; आता काय असेल...

Lok Sabha 2024 : निवडणुकांमध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय; आता काय असेल चित्र?

Subscribe

देशाच्या राजकारणात गेम चेंजर ठरणाऱ्या महिला मतदार 2029च्या निवडणुकीत पुरुषांपेक्षा जास्त मतदान करतील. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या संभाव्य 73 कोटी मतदारांपैकी केवळ 37 कोटी महिला असतील, असा अंदाज एसबीआयच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत ज्या 23 मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, त्यापैकी 18 राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त होती. या 18 पैकी 10 राज्यांमध्ये आधीचेच सरकार कायम राहिले. यावेळी देखील महिला मतदारांची संख्या लक्षणीय असेल, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) पाहाणी अहवालात देण्यात आला आहे. (Lok Sabha Elections 2024, increasing percentage of women voters will be decisive)

सतराव्या लोकसभेतील एकूण खासदारांपैकी केवळ 15 टक्के महिला होत्या. पहिल्या लोकसभेत ही संख्या पाच टक्के होती. देशात एकूण 96.8 कोटी मतदार आहेत. त्यापैकी जवळपास 68 कोटी लोक मतदानाचा हक्क बजावू शकतात. यामध्ये 33 कोटी म्हणजेच 49 टक्के महिला मतदार असतील, असा अनुमान एसबीआयच्या पाहाणी अहवालात देण्यात आला आहे.

- Advertisement -

सन 2047पर्यंत (2049मध्ये संभाव्य निवडणुका) महिला मतदारांची संख्या 55 टक्क्यांपर्यंत (50.6 कोटी) वाढेल तर पुरुषांची संख्या 45 टक्क्यांपर्यंत (41.4 कोटी) कमी होईल. या कालावधीत एकूण 115 कोटी मतदार असतील. त्यापैकी 80 टक्के म्हणजे 92 कोटी लोक मतदान करू शकतात, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या झपाट्याने वाढली. देशाच्या राजकारणात गेम चेंजर ठरणाऱ्या महिला मतदार 2029च्या निवडणुकीत पुरुषांपेक्षा जास्त मतदान करतील. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या संभाव्य 73 कोटी मतदारांपैकी केवळ 37 कोटी महिला असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

महिला मतदारांमध्ये वाढ

  • सन 2014मध्ये एकूण 83.4 कोटी मतदार होते. त्यापैकी पुरुष मतदार 43.7 कोटी आणि महिला मतदार 39.7 कोटी होते. तर, 2.3 कोटींनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
  • सन 2019मध्ये एकूण 89.6 कोटी मतदारांपैकी 46.5 कोटी पुरुष आणि 43.1 कोटी महिला होत्या. दीड कोटी मतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
  • आताच्या (2024) लोकसभा निवडणुकीत 96.8 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदानाचा हक्क बजावतील. त्यातही 1.8 कोटी नवे मतदार असतील.

शासनाच्या सर्व योजनांमध्ये महिला लाभार्थी आघाडीवर असल्याचे दिसते. स्टँडअप इंडियामध्ये त्यांचा सहभाग 81 टक्के आहे. मुद्रा कर्जामध्ये 68 टक्के, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत 37 टकके आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत 27 टक्के महिलांचा सहभग आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र आणि शरद पवारांच्या विरोधात षडयंत्र; सुप्रिया सुळेंची चंद्रकांत पाटलांवर टीका


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -