घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई..., फडणवीसांचे सुनेत्रा पवारांबद्दल वक्तव्य

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई…, फडणवीसांचे सुनेत्रा पवारांबद्दल वक्तव्य

Subscribe

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज बारमातीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यासभेत भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष रित्या शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

बारामती : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज बारमातीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यासभेत भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष रित्या शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. बारामतीकरांच्या मनामानातील सुनबाई असा सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत पवारांवर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 DCM Devendra Fadnavis Talk On Sunetra Pawar)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

भाषणाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असा उल्लेख सुनेत्रा पवारांचा केला. तसेच, “आजच्या सभेनेच बारामतीचा निकाल लावलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी 7 ते 8 लाख मतांची गरज असते. पण मंचावरील नेत्यांच्या मतदारांची गोळाबेरीज केली तर, ती 13 ते 14 लाखांच्या घरात जाते. त्यामुळे आता बारामतीला आणि वहिनींना कोणी थांबवू शकत नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

“आपल्याला बारामतीत लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदानासाठी आणायचं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, तुमच्या आशिर्वादाने इथे मोठा इतिहास घडेल. त्यानंतर सुनबाई दिल्लीला जातील. बारामतीत गेली 25 वर्ष सातत्याने अजित पवार यांनी विकास केला. पण आज आपल्याला जो विकास दाखवला जातो, त्यामध्ये मोलाचा वाटा हा अजित पवारांचा आहे. ही शरद पवारा विरुद्ध अजित पवार अशी नाही, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीही नाही तर, ही लढाई देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमुळे शरद पवार, सुप्रिया सुळे नेते बनणार नाही आहेत. तसेच, अजित पवार हे उपमुख्यमंत्र्यावर केंद्रात जाणार नाही आहेत. या निवडणुकीत केवळ बारामतीचा खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने उभा राहतो की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बाजूने उभा राहतो हे ठरवणारी ही निवडणूक आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग अखेर भाजपकडे; नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर

- Advertisement -

“या निवडणुकीत तुम्ही धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळावर केलेलं मत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं. पण तुतारी, मशाल आणि हाताच्या पंजावर पडलेले मत हे राहुल गांधी यांना जाते. त्यामुळे बारामतीकरांनीच ठरवायचं आहे की, तुम्हा मोदींना निवडून आणायचं आहे की राहुल गांधी या निवडून आणायचं आहे. विकासाला मत द्यायचं की विनाशाला मत द्यायचं हा निर्णय तुम्हाला करायचा आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“या निवडणुकीत वेगवेगळ्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. पण या गोष्टींनी विचलीत होऊ नका. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेला विकास आपण पाहिला. 20 कोटी लोकांना झोपडीतून घरांत आणलं. 55 कोटी लोकांना घरात शौचालय बांधून दिले. ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांच्या घरी गॅस पोहोचवला. 60 कोटी लोकांच्या घरी पिण्याची पाणी नळाद्वारे पोहोचवले. 50 कोटी लोकांसाठी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरवल्या. 80 कोटी जनतेला रेशनचे मोफत अन्नधान्य पुरवले. मागील 10 वर्ष केवळ ट्रेलर दाखवला. पण पुढच्या पाच वर्षात पिक्चर असेल. एक बदललेला भारत आपल्याला बघायला मिळेल. जो भारत संरक्षित आहे. अशा भारताच्या निर्मितीची निवडणूक आहे”, देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : निवडणुकांमध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय; आता काय असेल चित्र?

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -