Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthतुम्ही पण ब्रेड खाताय, कॅन्सरचा धोका वाढू शकतो

तुम्ही पण ब्रेड खाताय, कॅन्सरचा धोका वाढू शकतो

Subscribe

आजकालच्या धावपळीच्या जगात बहुतेक लोक खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत. सकाळी काहीही खाऊन ऑफिस किंवा शाळेत पोहोचायचं टार्गेट असतं. अशा परिस्थितीत, बहुतेक घरांमध्ये नाश्ता करण्यासाठी ब्रेडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.अनेकांना जाम ब्रेड किंवा टोस्ट ब्रेड खाणे आवडते. पण दूध किंवा चहासोबत पांढरं ब्रेड खाल्ल्यास गंभीर नुकसान होऊ शकते. एका रिसर्चनुसार ब्रेड खाल्ल्याने कोलोरेक्टल कॅन्सर होण्याचा धोका वाढल्याचे समोर आले आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार व्हाईट ब्रेड आणि अल्कोहोलच्या सेवनाने कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढतो असे एका संशोधनात आढळून आले आहे. कोलोरेक्टल कॅन्सर अनेकदा अनियमित खाण्याच्या सवयी, धूम्रपान आणि अति मद्यपान यांमुळे होतो. कर्करोगात काही लक्षणे असू शकतात ज्यात वजन कमी होणे, थकवा, अशक्तपणा, ताप, विचित्र गाठी, संसर्ग आणि इतर समस्या समाविष्ट आहेत.

- Advertisement -

पांढऱ्या ब्रेडमध्ये रिफाइंड पीठ असते जे तुमच्या आरोग्याला हानी पोहचवते. पोटॅशियम ब्रोमेट, पोटॅशियम आयोडेट हे दोन्ही केमिकल कॅन्सरजन्य आहेत. या दोन्ही केमिकल्सचा वापर पीठ फुगवण्यासाठी केला जातो. ब्रेडमध्ये पौष्ठिक घटकांच्या कमतरतेमुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. पण जर तुम्ही ब्रेड खाणं सोडू शकत नसाल तर तुम्ही ब्रेडऐवजी कमी प्रमाणात ब्राऊन ब्रेड खाऊ शकता.

अभ्यासात सांगण्यात आल्याप्रमाणे सकस आहाराचे पालन करून कर्करोगाचा धोका कमी करता येतो. तुमच्या आहारात संपूर्ण धान्य, फळे, भाज्या आणि प्रथिनांचे स्रोत समाविष्ट करा. याशिवाय दारू पिणे टाळा आणि नियमित व्यायाम करा, ज्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. कर्करोगाचा धोका ओळखण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि स्क्रीनिंग चाचण्या घेणे देखील महत्त्वाचे आहे.

- Advertisment -

Manini