घरनवी मुंबईCyber Crime रोखण्यासाठी सरसावले नवी मुंबई पोलीस; शॉर्ट फिल्ममधून करणार जनजागृती

Cyber Crime रोखण्यासाठी सरसावले नवी मुंबई पोलीस; शॉर्ट फिल्ममधून करणार जनजागृती

Subscribe

नवी मुंबई सायबर सेलने एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सायबर क्राईम रोखण्यासाठी जनजागृती सुरु केली आहे.

नवी मुंबई : तंत्रज्ज्ञानाचा विकास झाल्यावर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी त्याचा फायदा घेणे सुरू केले. सामान्य लोकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. अशा गुन्हयांची उकल करण्यासाठी पोलिसांना सायबर प्रशिक्षण आवश्यक झाले आहे. हिच निकड लक्षात घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई पोलिसांना सायबर गुन्हेगारांच्या शोधासाठी भारतीय विद्या भवन यांच्या केएम मुंशी इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज (KM Munshi Institute of Advanced Studies) तर्फे प्रशिक्षण शिबिर दिले जाणार आहे. नवी मुंबई सायबर सेलने एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सायबर क्राईम रोखण्यासाठी जनजागृती सुरु केली आहे.(Navi Mumbai Police rushed to stop Cyber Crime; Public awareness through short film)

सायबर सेलने फेसबुकच्या (Facbook) माध्यमातून भावनिक आवाहन करुन पैसे मागणे, ऑनलाइन अ‍ॅपद्वारे कर्ज देऊन त्याचा परतावा न दिल्यास कर्जदात्याचा अपमानकारक प्रचार करणे, सोशल मीडियावर मुलींशी मैत्री करुन सदर मुलीचे चॅट व व्हिडीओ संभाषण प्रसिध्द करुन किंवा तिच्या प्रोफाईल फोटोचे म्रॉपिंग करुन बदनामी करणे, गुगलच्या माध्यमातून नागरिक एखादी माहिती जाणून घेत असताना बोगस अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहारातील अ‍ॅपचे पासकोड मागून आर्थिक फसवणूक करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता, ही नवी मुंबईकरांच्या सुरक्षेला अग्रक्रम देत जनजागृती मोहिम सुरु केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : “कोणीतरी जीवे मारण्याचा प्रयत्न करतंय” भाजप आमदार प्रसाद लाड यांचे सरकारला पत्र

कृती सेनॉन करणार आवाहन

या शॉर्ट फिल्ममध्ये बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन यांनी नागरिकांना कोणत्याही मोबाइल अ‍ॅप, सोशल मीडिया आणि वेबसाईटचा वापर करताना आपल्या सुरक्षेबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सायबर क्राईमपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोणताही व्यवहार करताना पडताळणी करुन व्यवहार करण्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मृत्यूपूर्व जबानी विरोधात असली तरी सर्वोच्च न्यायालयाने दोषीला केले मुक्त, काय आहे प्रकरण?

पोलीस आयुक्त भारंबे म्हणतात…

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सायबर क्राईमच्या कोणत्याही घटना किंवा ऑनलाइन फसवणूक झाल्यास 112 या क्रमांकावर संपर्क साधवा. नवी मुंबई पोलिसांचे सायबर सेल जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर राहणार असून नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये तसेच ऑनलाइन व्यवहार करताना अलर्ट राहण्याचे आवाहन नवी मुंबईकरांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -