घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली

नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली

Subscribe

नाशिक : महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाली असून साखर आयुक्त पुणे या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुलकुंडवार हे प्रशिक्षणासाठी गेल्या वीस दिवसांपासून मसुरी येथे गेले असल्याने प्रभारी आयुक्त म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे कामकाज पाहत आहे.

जूलै २०२२ मध्ये पुलकुंडवार यांनी नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्विकारला होता. वर्षभराचा कार्यकाळ पुर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली आहे. २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले पुलकुंडवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. पुलकुंडवार यांच्या बदलीने आता नाशिकच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -