Saturday, April 27, 2024
घरमानिनीडास चावल्यानंतर हाता-पायांना आलेल्या दाण्यांना अशा पद्धतीने करा दूर

डास चावल्यानंतर हाता-पायांना आलेल्या दाण्यांना अशा पद्धतीने करा दूर

Subscribe

उन्हाळा सुरु झाल्यानंतर घामाच्या धारा निघतातच. पण त्याचसोबत काही किडे-किटक सुद्धा यावेळी जगणं मुश्किल करतात. सर्वाधिक समस्या तर डासांची होती. ज्यांची उन्हाळ्यात अधिक वाढ होते. अशातच आपण डासांना दूर पळवण्यासाठी कॉइल लावतो अथवा काही ना काही उपाय करतो तरीही डास चावतातच.खरंतर डास हे व्यक्तीच्या रक्ताकडे अधिक आकर्षित होतात, त्यामुळेच ते आपल्याला चावतात. ते चावल्यानंतर भले आपल्याला काही होत नाही पण नंतर त्वचेवर खाज येण्यास सुरुवात होते आणि अशातच त्यांचे दाणे येऊ लागतात.

खरंतर डास आपल्यासोबत काही आजार घेऊन फिरतात. अशातच ते चावल्यानंतर आपण आजारी पडतो. यापासून बचाव करण्यासाठी आपण काही क्रिम अथवा ऑइंटमेंट लावतो. पण तरीही त्यामुळे काही बरे वाटत नाही. अशातच तुम्ही काही घरगुती उपाय वापरु शकता.

- Advertisement -

-लेमन बाम


लेमन बाम हा पुदीन्याप्रमाणेच दिसतो. हे असे एक हर्ब आहे जे फार काळापासून त्वचेसंबंधित समस्यांसाठी वापरले जाते. एका जुन्या अभ्यासानुसार लेमन बाम लावल्यानंतर येणारी अधिक खाज कमी होते. याची पान तुम्ही डास ज्या ठिकाणी चावले आहेत तेथे लावू शकता.

- Advertisement -

-तुळशीची पाने


तुळशीची पाने सुद्धा त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात. यामध्ये अँटीऑक्सिडेंट हे खाज, जळजळ कमी करतात.

-पेपरमिंट ऑइल


पेपरमिंट ऑइल हा सुद्धा डासांमुळे येणाऱ्या खाजेच्या दाण्यांपासून तुमची सुटका करु शकतो. याचे २ थेंब हे नारळाच्या तेलात अथवा एलोवेरा जेलमध्ये टाकून लावू शकता.

-लसूणच्या पाकळ्या


लसूण हे आरोग्यासाठी फायदेशीर असतेच हे सर्वांनाच माहिती आहे. हृदय रोग ते उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी हे फायदेशीर मानले जाते. अशातच जर तुम्हाला डास चावल्यानंतर त्वचेवर दाणे आले असतील तक लसूणच्या पाकळ्या बारीक कापून त्या तेलात मिक्स करुन ते लावा.

-कॅमोमाईल टी
 
तणाव आणि एंग्जायटीला दूर करण्यासाठी कॅमोमाईल टी चा वापर केला जातो. यामुळे खाज, रॅशेज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. यासाठी याच्या फुलांची पाने अर्ध्या कप पाण्यात घेऊन ती ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर कापसावर त्याचे पाणी घेऊन ज्या ठिकाणी डास चावले आहेत तेथे लावा.

 


हेही वाचा: तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी करु शकतात ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini