घरमुंबईMNS : भाजपा समर्थन आणि विरोधाच्या हिंदोळ्यावरचा मनसे मेळावा, आज कोणती भूमिका?

MNS : भाजपा समर्थन आणि विरोधाच्या हिंदोळ्यावरचा मनसे मेळावा, आज कोणती भूमिका?

Subscribe

कुणाशीही युती नाही. जे करायचं ते स्वबळावर, असा निर्धार करणारे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याचीचर्चा रंगली आहे. गेल्या 10 वर्षांत भाजपाचे समर्थन तर कधी विरोध अशा हिंदोळ्यावर झुलणाऱ्या मनसेची भूमिका, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काय असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुंबई : कुणाशीही युती नाही. जे करायचं ते स्वबळावर, असा निर्धार करणारे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याचीचर्चा रंगली आहे. गेल्या 10 वर्षांत भाजपाचे समर्थन तर कधी विरोध अशा हिंदोळ्यावर झुलणाऱ्या मनसेची भूमिका, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काय असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्याला 2016पासून सुरुवात झाली. त्यात राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपा – शिवसेना युतीसह मोदी सरकारवरही टीकास्त्र सोडले होते. त्यावेळी त्यांच्या निशाण्यावर एमआयएमचे नेते ओवैसी बंधू तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य हे देखील होते. तथापि, त्यांची भूमिका केवळ विरोधकाचीच होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी म्हणजेच 2017 रोजी काही कारणास्तव हा मेळावा झाला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackeray Gudi Padwa 2024 : मनसेच्या पाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात; राज ठाकरे कोणती भूमिका घेणार?

परंतु 2018मध्ये त्यांनी मोदी सरकारविरोधात अगदी कट्टर विरोधकाची भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशदौरे करतात, पण भारतात लक्षणीय विदेशी गुंतवणूक झाली नाही, असा दावा करत ‘मोदीमुक्त भारता’ची गरज आहे, असे ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी राम मंदिरावरून देशात दंगेधोपे होतील, अशी भीतीही व्यक्त केली होती. 2014मध्ये त्यांनी मोदी यांना पंतप्रधानपदासाठी समर्थन दिले होते. मात्र, आपली दिशाभूल करण्यात आल्याने आपण समर्थन केल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

- Advertisement -

सन 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आणखी कठोर भूमिका घेतली. राजकीय पटलावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव पुसून टाकण्याचे आवाहन त्यांनी गुडी पाडवा मेळाव्यात केले. त्यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना हिटलरशी केली होती. त्यांना पुन्हा निवडून दिले तर, देशात पुन्हा निवडणूक होणार नाही आणि सर्वसामान्यांच्या अधिकारांवरही गदा येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा – Politics : भगवा आतंकवाद म्हणणाऱ्यांना…; गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना सातपुतेंचा प्रणिती शिंदेंवर निशाणा

कोरोना महामारीमुळे 2020 आणि 2021 अशी सलग दोन वर्षे मनसेचा गुढी पाडवा मेळावा झाला नाही. मात्र, याच दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेत हळूहळू बदल करण्यास सुरुवात केली. 2020च्या सुरुवातीला त्यांनी आपल्या झेंड्यात बदल केला. भगव्या रंगावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असा झेंडा त्यांनी स्वीकारला. तेव्हाच त्यांची भाजपाशी जवळीक वाढणार असल्याचे संकेत मिळाले होते. 2022च्या गुडी पाडवा मेळाव्यात त्यांनी थेट मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. हे भोंगे हटविले नाहीत तर, या मशिदीसमोर मोठे स्पिकर लाऊन हनुमान चालीसा म्हटली जाईल, असा इशाराच त्यांनी दिला होता. याशिवाय, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप केला होता.

गेल्यावर्षीच्या म्हणजेच 2023च्या मेळाव्यात त्यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य केले होते. गेले काही महिने राजकारणाचा खेळ, बट्ट्याबोळ पाहत आहोत. हे सगळे राजकारण पाहून वाईट वाटत होते. शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण यावर झालेल्या वादामुळे वेदना झाल्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी सभा न घेता, महाराष्ट्रासाठी काम करण्याचा सल्लाही त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता.

हेही वाचा – Sangli Lok Sabha : काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

सध्या ते महायुतीमध्ये सहभागी होण्याची चर्चा आहे. 18-19 मार्च रोजी त्यांची अमित शहा यांच्याबरोबर नवी दिल्लीत बैठक झाली. दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झाले नाही. मला या सांगितले आणि मी आलो, एवढेच राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. पण त्यांना महायुतीत सहभागी करून राज ठाकरे यांचे निकटवर्ती समजले जाणारे बाळा नांदगावकर यांना राज्यसभा तर अमित ठाकरे यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देण्याचा विचार भाजपाचा असल्याचे सांगण्यात येते. पण आजच्या गुढी पाडव्या मेळाव्यात हे चित्र स्पष्ट होईल, ही अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -