घरमहाराष्ट्र'या' कार्यक्रमानिमित्ताने शरद पवार-देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

‘या’ कार्यक्रमानिमित्ताने शरद पवार-देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज पुन्हा एकाच मंचावर येणार आहे. शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावर कार्यक्रमासाठी सोलापूरात येणार आहेत. या कार्यक्रमात दोन्ही नेते काय बोलणार आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या कार्यक्रमात एकाच मंचावर उपस्थितीत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. आज सांगोलात गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण निमित्ताने आमने-सामने येणार आहेत. हा कार्यक्रम सांगोल्याचे आमदार शहाजीबाजू पाटील यांच्या मतदारसंघात दोन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार आहेत.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तीन वर्षांपूर्वीचा पहाटेच शपथविधी शरद पवार यांच्या संमतीने झाला होता, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला होता. यानंतर पवार आणि फडणवीसांमध्ये बरीच टोलेबाजी झाली होती. हे अर्धसत्य समोर आले, आता उरलेले सत्य लवकरच समोर येईल, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – अजित पवार-शरद पवार यांच्या भेटीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले…

- Advertisement -

काका-पुतणे भेटीसंदर्भात फडणवीस म्हणाले…

शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीसंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला या भेटीबद्दल काही माहिती नाही. या भेटीसंदर्भातील काही तपशील माझ्याकडे नाही. भेटी झाली नाही, किती वेळ झाली. यासंदर्भातील कोणतीही माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी तुमच्या ज्ञानात काही भर टाकून शकत नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -