घरमहाराष्ट्रअंगप्रदर्शक, फाटलेल्या जिन्स चालणार नाहीत; सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात ड्रेसकोड लागू

अंगप्रदर्शक, फाटलेल्या जिन्स चालणार नाहीत; सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात ड्रेसकोड लागू

Subscribe

क्षी क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आला आहे. अंगप्रदर्शक तसंच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या भाविकांना थेटपणे मंदिर प्रवेश करता येणार नाही.

भारतीय संस्कृती, परंपरांचे रक्षण, संवर्धन आणि जतन करण्याबरोबरच मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्षी क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आला आहे. अंगप्रदर्शक तसंच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या भाविकांना थेटपणे मंदिर प्रवेश करता येणार नाही. अशा भाविकांना देवस्थानकडून शाल, उपरणे, पंचा, ओढणी आदी वस्त्रं मोफत देण्यात येतील. दर्शनानंतर ती वस्त्रं परत घेतली जाणार असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे. यासाठी भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. ( Kunkeshwar Temple Dress code Body shaping ripped jeans are not allowed Dress code enforced at Kunkeshwar temple in Sindhudurga)

भाविकांनी ड्रेसकोडचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईदेखील केली जाणार आहे. महिलांसह पुरुषांनाही नवे नियम लागू असणार आहेत. श्रावण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागू करण्यात आलेल्या नियामावलीचं पालन करण्याचं आवाहन देवस्थानाकडून करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात कुणकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे आता मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी नव्या ड्रेसकोडचं पालन करावं लागणार आहे.

- Advertisement -

या कुणकेश्वर मंदिर पुरातन पांडवकालीन मंदीर असून याठिकाणी स्वयंभू पिंडी आहे. मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. काशी येथे 108 शिवलिंग आहेत तर कुणकेश्वर येथे 107 शिवलिंगं आहेत. मात्र ही शिवलिंग समुद्राच्या काठावर असल्यामुळे ही ओहोटीच्या वेळीच पाहायला मिळतात. या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगामुळेच या स्थानाला कोकणची काशी असंही म्हटलं जातं.  गेली अनेक वर्षे या शिवलिंगांवर समुद्रातील लाटांचा बाराही महिने मारा चालू असतो. तरीही शिवलिंगं झिजलेली नाहीत. सध्या केवळ 5 ते 6 ठिकाणी शिवलिंगं पाण्याच्या ओहोटीच्या वेळी दृष्टीस पडतात .

( हेही वाचा: “केंद्र सरकार नामर्दासारखे वागते; सत्ता टिकावी म्हणून…”, बच्चू कडू यांची टीका )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -