Friday, June 9, 2023
घर मानिनी Health उन्हाळ्यातील फंगल इंन्फेक्शनवर घरगुती उपचार

उन्हाळ्यातील फंगल इंन्फेक्शनवर घरगुती उपचार

Subscribe

उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांश जणांना फंगल इंन्फेक्शनची समस्या होते. हे एक त्वचेसंबंधित संक्रमण असते. फंगल इंन्फेक्शनच्या वेळी लाल डाग, दाद, खाज येते. परंतु बहुतांश फंगल इंन्फेक्शन उपचार केल्यानंतर बरे होतात. खरंतर यामागे काही कारणं असू शकतात. पण इम्युनिटी कमजोर होणे, गरम आणि ढगाळ वातावरण ही सुद्धा त्याची काही खास कारण असू शकतात. अशातच तुम्ही घरच्या घरी उन्हाळ्यात इंन्फेक्शनवर उपचार करु शकता.

अ‍ॅपल साइडर व्हिनेगर

- Advertisement -


जर फंगल इंन्फेक्शन झाले असेल तर अॅपल साइडर व्हिनेगरचा वापर करु शकता. फंगल इंन्फेक्शन दूर करण्यासाठी अॅपल साइडर व्हिनेगर पिऊ शकता.

टी ट्री ऑइल

- Advertisement -


फंगल इंन्फेक्शन दूर करण्यासाठी टी ट्री ऑइलचा वापर करु शकता. खरंतर टी ट्री ऑळ मध्ये अँन्टीफंगल आणि अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात. अशातच फंगल इंन्फेक्शनची लक्षण कमी करण्यासाठी टी ट्री ऑइल फायदेशीर ठरु शकतो. यासाठी तुम्ही नारळाचे तेल घेत त्यात टी ट्री ऑइल टाका. हे मिश्रण फंगल इंन्फेक्शनवर लावा.

नारळाचे तेल


नारळाचे तेल फंगल इंन्फेक्शन दूर करण्यास मदत करते. या तेलात अँन्टीफंगल गुण असतात. यामुळे फंगल इंन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इंन्फेक्शन दूर होऊ शकते.

कोरफड


कोरफड त्वचेसाठी फार उत्तम मानले जाते. यामुळे स्किन इंन्फेक्शन आणि फंगल इंन्फेक्शन दूर होऊ शकते. कोरफड मध्ये अँन्टीऑक्सिडेंट्स, अँन्टीफंगल गुण असतात. यामुळे स्किन रेडनेस, जळजळ, खाजेपासून आराम मिळतो.

कडुलिंबाची पान


कडुलिंबाच्या पानांमुळे फंगल इंन्फेक्शनची समस्या दूर होते. याच्या पानांमध्ये अँन्टीफंगल गुण असतात. त्यामुळे कडुलिंबाची पान तुम्ही उकळा आणि नंतर फंगल इंन्फेक्शन झालेल्या ठिकाणी त्या पाण्याने पुसून घ्या.


हेही वाचा- Summer allergy : उन्हाळयात अ‍ॅलर्जीकडे करू नका दुर्लक्ष

- Advertisment -

Manini