घरमहाराष्ट्रनागपूरLok Sabha : पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासन सज्ज; दिग्गज नेत्यांचे भविष्य मतपेटीत...

Lok Sabha : पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासन सज्ज; दिग्गज नेत्यांचे भविष्य मतपेटीत होणार बंद

Subscribe

राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली -चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघात होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

नागपूर : आरोप-प्रत्यारोप, टीकेचे जोरदार प्रहार, नेत्यांच्या सभा, पदयात्रा यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शिगेला पोहचलेला प्रचार बुधवारी (17 एप्रिल) थंडावला. प्रत्यक्ष प्रचार संपला असला तरी उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भर आता छुप्या प्रचारावर असणार आहे. तसेच राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली -चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघात होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024 Administration ready for the first phase of polling)

नागपूर जिल्ह्यात एकूण 4510 मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 2405, तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुमारे 54 टक्के मतदान झाले होते. यंदा ही टक्केवारी 75 टक्क्यांवर न्यावयाची आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 63 तर नागपूरमध्ये 61 केंद्रे आहेत. या केंद्रांवर विशेष लक्ष राहणार असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. यातील सुमारे 50 टक्के मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून 12 महिला मतदान  केंद्रे  असणार आहेत. प्रत्येक विधानसभेत प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : ‘चारशे पार’चा जुमला म्हणजेही वेडेपणाच, ठाकरे गटाचे भाजपावर टीकास्त्र

नागपूर लोकसभेसाठी 321 पोलीस अधिकारी, 4 हजार 250 पोलीस कर्मचारी आणि 1 हजार 800 होमगार्डस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. रामटेकसाठी 151 अधिकारी, 2 हजार 676 कर्मचारी, 1 हजार 534 होमगार्ड आणि 3 केंद्रीय पथक असणार आहेत. संवेदशील केंद्रामध्ये अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत. तसेच सी व्हिजिल या ॲपवर 64 तक्रारींची नोंद करण्यात आली. यातील 20 तक्रारींमध्ये तथ्य  आढळून आले नाही, मात्र 44 तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इटनकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 4510 मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात 18 लाख 37 हजार 906 मतदार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यात सुरळीत मतदान पार पडावे यासाठी 9 हजार 322 निवडणुक कर्मचारी आणि 3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होत आहे. त्यात राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली -चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर आणि चंद्रपूर मतदार संघात दुहेरी लढत होणार आहे. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे हे उभे आहेत. तसेच चंद्रपूरमधून भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर मैदानात आहेत.

हेही वाचा – Lok Sabha : उमेदवारी जाहीर होताच नारायण राणे म्हणतात, अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार

रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. रामटेक मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे राजू पारवे, महाविकास आघाडीकडून श्याम बर्वे आणि अपक्ष उमेदवार किशोर गजभिये हे उमेदवार आहेत. रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांचे पती श्याम बर्वे मैदानात आहेत. तर वंचितने किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर करून महायुती आणि महाविकास आघाडीची कोंडी करण्याच प्रयत्न केला आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, महायुतीचे अशोक नेते आणि वंचितचे हितेश मडावी यांच्यात लढत होणार आहे. तर भंडारा-गोंदिया मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे आणि वंचितचे उमेदवार संजय केवट यांच्यात लढत होणार आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -