Monday, April 29, 2024
घरमानिनीजेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होत असल्यास 'या' पद्धतीने करा कंट्रोल

जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होत असल्यास ‘या’ पद्धतीने करा कंट्रोल

Subscribe

जेवणं खुप मस्त होतं, पोट भरलं आता काहीतरी गोडं खाऊयात का? असे शब्द नेहमीच जेवल्यानंतर बहुतांश लोकांच्या तोंडून निघतात. जर जेवल्यानंतर गोड खाल्ले नाही तर काहींना जेवण पूर्ण न झाल्यासारखे वाटते. दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याचे मनं करत असेल ही गोष्ट वेळीच कंट्रोल करावी. अन्यथा याचा आपल्या आरोग्यावर कालांतराने परिणाम होतो.

हलकी फुलकी स्वीट क्रेविंग्स हे सर्वसामान्य आहे. परंतु अधिक गोड खाण्याची सवय लागली तर तुम्हाला मधुमेहसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अशातच ही सवय नियंत्रित करण्यासाठी नक्की काय करावे हे जाणून घेऊयात.

- Advertisement -

जेवल्यानंतर काहीतरी गोडं खाण्याची इच्छा होत असेल तर यामागे काही कारणं असू शकतात. डिहाइड्रेशन, शरिरात मॅग्नेशियमची कमतरता, अवेळी खाणंपिणं या अशा सवयींमुळे शुगर क्रेविंग्स होऊ शकतात. यावरुन कुठेतरी संकेत मिळतात की, शरिराला पूर्पपणे न्युट्रिशन मिळत नाहीयेत.

- Advertisement -

कसे कराल कंट्रोल?
-आपल्या खाण्यात प्रोटीनचे प्रमाण वाढवा. प्रोटीन इंसुलिन सेंसिटिविटी सुधरवण्यास मदत करते.
-कार्ब्स पूर्णपणे खाणं बंद करु नका. आपल्या डाएटमध्ये कार्ब्सचा समावेश जरुर करा.
-पाणी जरुर प्या, कारण पाण्याच्या कमतरतेमुळे शुगर क्रेविंग्सची इच्छा अधिक होते.
-मेथीच्या दाण्याचे पाणी प्या. यामुळे आपल्या शरिरात ब्लड शुगरचा स्तर वाढवण्यास रोखते.
-आपल्या डाएटमध्ये मॅग्नेशियम युक्त पदार्थांचे सेवन करा


हेही वाचा: Pregnancy Food : प्रेग्नन्सीमध्ये कणीस खाणे आरोग्यास हितकारक

- Advertisment -

Manini