घरदेश-विदेश'...तर मी राजीनामा देईन'; अमित शाहांना फोन केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी...

‘…तर मी राजीनामा देईन’; अमित शाहांना फोन केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी फेटाळला

Subscribe

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या टीएमसी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा संपुष्टात आल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांना फोन केल्याची बाब समोर आली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी या अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी टीएमसीच्या राष्ट्रीय दर्जाबाबत मी अमित शाहा यांना फोन केला हे सिद्ध झाले तर राजीनामा देईन, असेही त्यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी टीएमसी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर आणि आमदार मुकुल रॉय यांनी पक्ष सोडल्यामुळे कोलकाता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या वतीने गृहमंत्री अमित शाहा यांना फोन केल्याची बाब समोर आली आहे. मात्र या सर्व अफवा असल्याचे ममता बॅनर्जी याने म्हटले आहे. त्यांनी बुधवारी (19 एप्रिल) सांगितले की, टीएमसीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी अमित शाहा यांना फोन केल्याचे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन.

- Advertisement -

बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांनी फोन केल्याचा आरोप केला होता. त्यांनी मंगळवारी (18 एप्रिल) दावा केला होता की, निवडणूक आयोगाने टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर ममता यांनी अमित शहा यांना फोन करून निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांचे दावे फेटाळून लावले आहेत.

- Advertisement -

संविधानावर बुलडोझर चालवता येणार नाही
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप सत्तेत आहे म्हणून ते केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत आहेत. खुर्ची येते-जाते, पण लोकशाही कायम राहते, हे त्यांना समजत नाही. संविधान कायम राहील, त्यात काही दुरुस्त्या होऊ शकतात, मात्र या संविधानावर बुलडोझर चालवता येणार नाही. त्यामुळे भाजपा आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकू शकणार नाही.

मुकुल रॉय हे भाजपचे आमदार आहेत
मुकुल रॉय यांनी टीएमसी सोडण्याच्या मुद्दावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मला माहीत आहे मुकुल रॉय हे भाजपचे आमदार आहेत. त्यांना धमकावण्यात आले आहे, ही छोटी गोष्ट आहे. एखाद्याला दिल्लीला जायचे आहे की नाही, हा पूर्णपणे त्या व्यक्तीचा विशेषाधिकार आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
त्यांनी सांगितले की, मुकुल रॉय यांच्या मुलाने वडिलांचे अपहरण झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्याने तक्रारही नोंदवली आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचा मुलगा शुभ्रांशूला मुकुल रॉय यांच्याबद्दल विचारा. मात्र राज्य प्रशासन मुकुल रॉय यांच्या बेपत्ता तक्रारीची चौकशी करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -