Sunday, June 11, 2023
घर मानिनी Health मुलांच्या जेवणात तुम्हीही करताय का 'या' चुका?

मुलांच्या जेवणात तुम्हीही करताय का ‘या’ चुका?

Subscribe

मुलांची रोगप्रतिकारक शक्ती जेव्हा कमी होते तेव्हा ते आजारी पडतात. यावेळी पालकांचे काम वाढले जाते. अशावेळी पालकांनी त्यांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाईल. आम्ही तुम्हाला अशा काही फूड्स बद्दल सांगणार आहोत ज्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाऊ शकते.

नट्स

- Advertisement -


रोगप्रतीकारक शक्ती वाढण्यासाठी नट्स तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. कारण यामध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. नट्स खनिज, विटामिन, अँन्टीऑक्सिडेंट आणि ओमेगा फॅटी अॅसिडचे एक समृद्ध स्रोत आहे. मुलांना अक्रोड, पिस्ता, बदाम द्या. या व्यतिरिक्त ड्राय फ्रुट्सची पावडरी किंवा भिजवलेला सुका मेवा सुद्धा तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. पण मुलांना जर नट्सची अॅलर्जी असेल तर डॉक्टरांना भेटा.

चीज

- Advertisement -


मुलांच्या आवडीच्या पदार्थांपैकी एक म्हणजे चीज. यामध्ये जिंकचे प्रमाण अधिक असते आणि जिंक संक्रमणापासून लढण्यासाठी अँन्डीबॉडी बनवण्यास कामी येतात. तुम्ही तुमच्या मुलांना चीज खायला देऊ शकता. परंतु ते प्रोसेस्ड चीज नसावे. उकडलेला बटाटा सँन्डविचमध्ये टाकून देऊ शकता.

मशरुम


या भाजीत ही जिंकचे प्रमाण फार असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्वात खास गोष्ट अशी की, विविध प्रकारच्या मशरुमध्ये अँन्टीबॅक्टेरियल आणि अँन्टीव्हायरल गुण असतात. परंतु मुलांना देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गाजर


गाजरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. त्याचसोबत यामध्ये व्हिटॅमिन ए असते. तुम्ही मुलांना गाजराचे सलाड, सूप ही देऊ शकता.


हेही वाचा- Immunity boostersसाठी ‘या’ प्रकारचे हेल्दी ज्यूस नक्की ट्राय करा

- Advertisment -

Manini