Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गद्दारांची गाडी चालवण्याची फडणवीसांवर वेळ, संजय राऊतांची खोचक टीका

गद्दारांची गाडी चालवण्याची फडणवीसांवर वेळ, संजय राऊतांची खोचक टीका

Subscribe

उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचे सडेतोड उत्तर ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते असलेले संजय राऊत यांच्याकडून देण्यात येते. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर कायमचं सत्ताधारी निशाणा साधून असतात.

एकेकाळी जिवलग मित्र असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे पक्के शत्रू झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पण त्यांच्या टीकेला उत्तर देण्याचे काम उद्धव ठाकरे मात्र करत नाही. पण उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचे सडेतोड उत्तर ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते असलेले संजय राऊत यांच्याकडून देण्यात येते. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर कायमचं सत्ताधारी निशाणा साधून असतात.

हेही वाचा – “आमचा विरोध संसद भवनला नाही तर…” संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. 24 मे) उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे विधान परिषदेत दोन तास थांबत नाहीत, त्यांना दिल्लीला कोण बोलवणार? अशी टीका फडणवीसांनी केली होती. त्यांच्या या टीकेला राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “सध्या लोकशाहीवादी, देशभक्तांना दिल्लीत बोलावल जात नाही. चमचे, चाटूगिरी करणारे आणि मोदींच भजन करणाऱ्यांना दिल्लीला बोलावल जातं. देशाच्या राष्ट्रपतींना बोलावल जात नाही, तिथे आमचं काय?” तर “देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकण्याची वाईट वेळ आलेली नाही. बाळासाहेबांनी कधीच व्यक्तीला विरोध केला नाही. भूमिकेला विरोध केला. देवेंद्र फडणवीस गद्दारांच्या गाड्या चालवतायत काय वाईट वेळ आलीय,” अशी खोचक टीका देखील संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली आहे. (Time for Fadnavis to drive traitors, Sanjay Raut’s harsh criticism)

- Advertisement -

तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी नवीन संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “नवीन संसद भवन उभारले, याचा आनंद आहे. पण यानिमित्ताने देशाच्या घटनेवर पुन्हा एकदा हल्ला होत आहे. याला आमचा विरोध आहे, असे स्पष्टीकरण राऊत यांनी यावेळी दिले. पंतप्रधान मोदी आताच तीन देशाच्या दौऱ्यावरून परत आले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे,” असे मत संजय राऊत यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisment -