Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthमानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी टीप्स

मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी टीप्स

Subscribe

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेक जण मानसिक आणि शारीरिक समस्यांना बळी पडत असल्याचे आपण दररोज पाहतोय. सोशल मीडियावर तर अनेक लाईफ कोच हे या विषयांवर सल्ले देताना तुम्ही ऐकले असतील किंवा पहिले तर असतीलच. मात्र, तुम्ही शांतपणे जर काही गोष्टींचा विचार केलात तर याचे उत्तर तुम्हाला स्वतः जवळच मिळेल.

खरे पाहता, तुम्ही आयुष्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता यावर सगळं अवलंबून आहे. आपली विचारसरणी, आपली लाइफस्टाइल आणि आपल्याशी जोडल्या गेलेल्या दररोजच्या छोट्या मोठ्या गोष्टींचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो हे आपण समजून घ्यायला हवे. अशा वेळी जर आपण काही सवयी आणि आपली लाईफस्टाईल सुधारण्याचा प्रयन्त केला तर याचा आपल्या जीवनावर होणार नकारात्मक प्रभाव कमी होऊन तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहील.

Tips on maintaining good mental health

1)निसर्गासोबत वेळ घालवा
सोशिल मीडियाच्या या युगात आपण आभासी जगात जगत आहोत. खऱ्या जगाचा अनेकजणांना विसर पडत चालला आहे. सोशल मीडियाचा वापर करण्याच्या नादात अनेक जण हे एकलकोंडे झाले आहेत. निसर्ग हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे आणि यापासून जर अंतर पडू लागले तरी व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम व्हायला सुरुवात होते.

2)नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयन्त करा
जेव्हा तुम्ही नवनवीन गोष्टी शिकता तेव्हा तुमच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास जागा होतो आणि हा आत्मविश्वास तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करतो. नवनवीन गोष्टी शिकल्याने तुमची आकलन शक्ती सुधारते आणि तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहते.

3)स्वतःसाठी वेळ काढा
इतरांसाठी आयुष्य जगता-जगता कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा. मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे, स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. अनेकदा जबाबदाऱ्या इतक्या वाढतात की, याने मानसिक तणाव येऊ लागतो. त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणे खूप गरजेचे असते. यात तुम्ही आवडीचे पदार्थ, पुस्तक, स्वतःचे छंद जोपासू शकता.

4)योग किंवा ध्यान करा
योग किंवा ध्यान हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. त्यामुळे नियमित योग किंवा ध्यान करणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे योग करण्यास पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही ध्यानदेखील करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त वेळ आणि जागाही लागणार नाही. वास्तविक,ध्यानामुळे तुमचा श्वासोच्छ्वास नियमित होते. ब्लड सर्कुलेशन सुधारते.

5)क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटी करा
दररोजचे लाइफस्टाइल कधी-कधी कंटाळवाणे आणि स्ट्रेसफुल असते. अशा परिस्थतीत, तुम्ही काही क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटी केल्यास स्वतःमध्ये तुम्हाला बराच फरक जाणवेल. याने तुमचा मूडही बदलेल आणि स्ट्रेसही दूर होईल. म्हणून तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये सिंगिंग, डान्सिंग, पेंटिंग यासारख्या क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटी करू शकता.


हेही वाचा ; तणाव दूर करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

- Advertisment -

Manini