सध्या देशभरात थंडीची लाट पसरली आहे. याकाळात अनेकजण कुटुंबिय किंवा मित्रांसोबत पिकनिक प्लॅन करतात. हिवाळ्यातील पिकनिक नक्कीच आपल्याला रिफ्रेश करणारी ठरते. सुट्ट्यांसाठी बाहेर फिरायला जाताना जिथे शुद्ध हवा असेल असे छान निसर्गरम्य ठिकाण आपण निवडतो. भारतातही अशी शुद्ध हवेची पाच ठिकाणं आहेत जिथे तुम्ही प्रदूषणापासून दूर राहून सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
भारतातील शुद्ध हवेची ठिकाण
- अमरावती (आंध्र प्रदेश)
आंध्र प्रदेशातील अमरावती हे ठिकाण कपल्ससाठी खास आकर्षणाचे स्थळ आहे. या शहरात अनेक तीर्थ स्थळे, हेरिटेज इमारती प्रसिद्ध आहेत. अमरावतीत तुम्हाला हरिकेन पॉइंट,भीम कुंड,अंबादेवी मंदिर, छत्री तलाव, वडाली तलाव,सतीधाम मंदिर यासारख्या सुंदर जागा पाहू शकता.
- आयजोल (मिझोराम)
मिझोराममधील आयजोल हे ठिकाण भारतातील शुद्ध हवा असलेल्या शहारापैंकी एक आहे. कमी खर्चात सुंदर जागी तुम्हाला सुट्ट्यांचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी आयजोल हे ठिकाण उत्तम आहे. आयजोलमध्ये फिरण्यासाठी फार सुंदर ठिकाणे आहेत. त्यातील खावंगलांग वन्यजीव अभायारण्या, वानत्वांग वॉटरफॉल,तामडील झील, बुर्रा बाजार, मिझोराम स्टेट म्यूझियम, डर्टलांगच्या सुंदर टेकड्या , रेइक हेरिटेज गाव या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.
- विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)
थंडीच्या दिवसात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठीचे आंध्रप्रदेशचे विशाखापट्ट्णम हे शहर तुम्ही निवडू शकता. शांत समुद्र किनारे आणि विशाखापट्ट्णचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना प्रेमात पाडतो. विशाखापट्टणमध्ये पाहण्यासारखी आणि फिरण्यासाठी अनेक ठिकाण आहेत. इंदिरा गांधी झू लॉजिकल पार्क, कटिकी इरने, बोर्रा गुफा, INS कुरूसूरा सबमरीन म्युझिअम, कैलासगिरी, ऋषिकोंडा बीच, अकाकू घाटी, वराह लक्ष्मी नरसिंह मंदिर अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत.
- कोईब्तूर (तमिळनाडू)
दक्षिण भारतातील मॅनचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोईम्बतूर हे शहर शुद्ध हवेसाठी प्रसिद्ध आहे. तमिळनाडूमधील अनेक दर्शनीय स्थळे पहायला मिळतात. पश्चिमी घाटावरुन जवळपास 500 फुट उंचावर असलेले मरुधमलाई मंदिर पहायला मिळते. हे मंदिर द्रविड वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. त्याचप्रमाणे कोईम्बतूरमध्ये आदियोगी शिव स्टॅचू, वैदेही फॉल्स, कोवई कोंडट्टाम, पेरुर पाटेश्वरर मंदिर, सिरुवानी धबधबा यासारखी अनेक सुंदर जागांवर तुम्ही तुमच्या सुट्ट्या घालवू शकता.
- दावणगेरे (कर्नाटक)
कर्नाटकातील दावणगेरे या शहराला प्राकृतिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. भारतातील सर्वात शुद्ध हवेचे ठिकाण म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे. दावणगेरे येथे कुंडुवाडा केरे, बाथी गुड्डा, बेतुर, बागली यासारख्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सुट्ट्या घालवू शकता.
हेही वाचा :