Tuesday, April 30, 2024
घरमानिनीWorking महिलांनी रात्रीच्या जेवणासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Working महिलांनी रात्रीच्या जेवणासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

Subscribe

आजच्या काळात स्त्रिया घरकामाबरोबरच बाहेरची कामेही करत आहेत. अशा वेळी त्यांना घरकामाबरोबरच ऑफिसची कामेही सांभाळावी लागतात. त्यांना दोन्ही जागा व्यवस्थित हाताळाव्या लागतात, कधी कधी असं होतं की मीटिंग्स आणि इतर काही कामांमुळे महिलांना ऑफिसमधून घरी यायला उशीर होतो. अशा वेळी त्यांनाही घरी येऊन लवकर स्वयंपाक करावा लागतो, अशा परिस्थितीत काम कसे होणार याची चिंता त्यांना सतावते. महिलांनी रात्रीचे जेवण बनवण्याची चिंता करण्याची गरज नाही, फक्त स्वयंपाकाच्या काही टिप्स अवलंबा आणि काम लवकर संपवा. या लेखात आम्ही काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे काम सोपे होईल.

एक यादी तयार करा
स्वयंपाकघराचे काम करण्यापूर्वी आपल्याला काय बनवायचे आहे, कशावर काम करायचे आहे याची एक यादी तयार करा. यादी बनवून ती केव्हा, काय आणि
कशी करायची हे कळते.

- Advertisement -

चांगल्या दर्जाचे चाकू आणि चॉपर वापरा
स्वयंपाकघरातील भाज्या आणि इतर वस्तू कापण्यासाठी चांगल्या प्रतीचे धारदार चाकू आणि चॉपर वापरा. त्यामुळे काम जलद गतीने होते. तसेच भाज्या हव्या त्या शेपमध्ये कापल्या जातात.

मशीन वापरा
स्वयंपाकघरातील कामे लवकर पूर्ण करण्यासाठी मिक्सर, ब्लेंडर आणि प्रेशर कुकर सारखी भांडी आणि यंत्रे वापरा. यामुळे काम जलद गतीने आणि स्वच्छ होते.

- Advertisement -

शॉर्ट कट वापरा
ताज्या भाज्यांव्यतिरिक्त रात्री उशीर झाल्यास फ्रोजन भाज्या वापरा. या फ्रोजन भाज्या नीट कापून ठेवणे आवश्यक आहे.

एका भांड्यात अन्न शिजवून घ्या
एकाच भांड्यात अन्न शिजवलयास जास्त भांडी घाण होत नाहीत आणि शेवटी जास्त भांडी धुवावी लागत नाहीत.

मायक्रोवेव्ह आणि एअर फ्रायरने शिजवा
गॅसमध्ये स्वयंपाक करण्यासाठी बराच वेळ लागतो, त्यामुळे शक्य असल्यास मायक्रोवेव्ह आणि एअर फ्रायर सारखी उपकरणे वापरा.

ऑर्गनाईज पणे काम करा
स्वयंपाकघरात काम करताना जास्त वस्तू पसरवू नका, तसेच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू गॅसजवळ ठेवा आणि मग स्वयंपाक सुरू करा. यामुळे जेवण करताना गोंधळ होणार नाही आणि जेवण लगेच होईल.

जास्त अन्न शिजवा
जर तुम्ही सकाळी डाळ आणि भाज्या रात्रीसाठी जास्त बनवल्या तर रात्री पुन्हा भाजी आणि डाळ बनवावी लागणार नाही. तसेच रात्री उशीर झाला तर भात आणि ब्रेड बनवून उरलेले अन्न गरम करून पटकन खाऊ शकता

- Advertisment -

Manini