घरताज्या घडामोडीCoastal Road : कोणकोणत्या वाहनांना कोस्टल रोडवर असणार परवानगी? नियम काय आहेत?...

Coastal Road : कोणकोणत्या वाहनांना कोस्टल रोडवर असणार परवानगी? नियम काय आहेत? वाचा सविस्तर

Subscribe

धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग म्हणजेच मुंबईचा कोस्टल रोड आज वाहतुकीसाठी खुला झाला आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह अशा कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग म्हणजेच मुंबईचा कोस्टल रोड आज वाहतुकीसाठी खुला झाला आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह अशा कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. तसेच, कोस्टल रोडच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, ठाकरेंच्या नेत्यांनी कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येणं टाळलं. (Coastal Road this vehicle allowed for travel on mumbai coastal road)

प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा आज सुरू झाला आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू झाल्याने वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. पुढील काही दिवसांत मरीन ड्राईव्ह ते वरळी हा कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे. हा जोडरस्ता पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्रेपर्यंत काही मिनिटांत पोहोचणं शक्य होणार आहे. हा संपूर्ण कोस्टल रोडमध्ये एकूण आठ मार्गिका आहेत. त्यापैकी चार येणाऱ्या आणि चार जाणाऱ्या मार्गिका आहेत. तसेच बोगाद्यामध्ये येण्या-जाण्यासाठी 3-3 अशा मार्गिका आहेत. बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी 2.19 किमी इतकी आहे. मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असणार आहे. दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा आहे.

- Advertisement -

कोस्टल रोडवर वाहतूक कशी असणार?

  • बिंदू माधव ठाकरे जंक्शन ते मरीन ड्राइव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) दक्षिणेकडील दिशेने हा मार्ग कार्यान्वित असेल.
  • तुर्तास या कोस्टल रोडवरून सकाळी 8:00 वाजता वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश दिला जाईल. रात्री 8:00 वाजेपर्यंत वाहतुक सुरू राहील.
  • सोमवार ते शुक्रवारपर्यंत या निर्धारित वेळेत या मार्गावरून वाहतूक सुरू राहणार आहे.
  • या मार्गावर वाहतूक प्रवाहाची सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट निर्बंध लागू केले जातील.
  • कोस्टल रोडवर कमाल वेग मर्यादा सरळ रस्त्यावर 80 किमी प्रतितास.
  • या मार्गातील बोगद्यात 60 किमी प्रतितास.
  • वळण आणि प्रवेश/निर्गमन बिंदूंवर 40 किमी प्रतितास.
  • वाहने थांबवून वाहनांबाहेर पडण्यास तसेच मार्गावर थांबून फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे.

कोणत्या वाहनांना कोस्टल रोडवर परवानगी?

  • कोस्टल रोडवर अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड मालवाहू वाहनांना आणि सर्व मालवाहक वाहनांना परवानगी दिली जाणार नाही.
  • दुचाकी, सायकल, अपंग व्यक्तींच्या मोटारसायकल/स्कूटर, तीनचाकी, जनावरांसाठी काढलेल्या गाड्या, टांगा, हातगाड्या आणि पादचाऱ्यांना परवानगी असेल.
  • बेस्ट आणि एसटी बसेस व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना या मार्गावर परवानगी असेल.
  • बिंदू माधव ठाकरे जंक्शन येथून रात्री 08:00 ते 17:00 वाजण्याच्या दरम्यान प्रवेश करण्याची परवानगी आहे. सोमवार ते शुक्रवार पर्यंत ही परवानगी असेल.
  • इतर ठिकाणांहून 08:00 वाजण्याच्या दरम्यान प्रवेशास परवानगी आहे आणि ती सोमवार ते शुक्रवार रात्री 20:00 पर्यंत असेल.

हेही वाचा – Coastal Road : उबाठाचे बाळराजे म्हणत फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -