घरक्रीडाIPL 2024 : फ्लाइंग किस देणं हर्षित राणाला पडलं महागात; BCCI ने...

IPL 2024 : फ्लाइंग किस देणं हर्षित राणाला पडलं महागात; BCCI ने केली कारवाई

Subscribe

नवी दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने अंतिम षटकात शानदार गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शनिवारी हा सामना खेळवला गेला. मात्र, सामन्या दरम्यानच्या त्याच्या वर्तणुकीसाठी त्याला बीसीसीआयने दंड ठोठावला आहे.

सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज मयंक अग्रवाल आणि हेनरिक क्लासेन यांना बाद केल्यानंतर हर्षित राणाने भर मैदानात जे काही केलं त्यामुळे तो अडचणीत आला आहे. दरम्यान, हर्षितच्या गोलंदाजीमुळेच कोलकाताने शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा चार धावांनी पराभव केला. आणि आयपीएलच्या 17व्या हंगामाची विजयी सुरुवात केली.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2024 : अटीतटीच्या सामन्यात कोलकाताचा हैदराबादवर विजय

केकेआरने हैदराबादसमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मयंक आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादला वेगवान सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी 5.3 षटकात 60 धावा केल्या. पण सहावे षटक टाकायला आलेल्या हर्षितने मयंकला आऊट केले. हर्षितने केकेआरला पहिले यश मिळवून दिले. पहिली विकेट गेल्याने केकेआर संघात उत्साह निर्माण झाला तर हैदराबाद थोडं बॅकफूटवर गेलं. मात्र, मयंकची विकेट घेतल्यानंतर खूप आनंदित झालेल्या हर्षितने मयंकला फ्लाइंग किस दिला. शांत स्वभावाच्या मयंकला हर्षितची ही शैली आवडली नाही आणि त्याने हर्षितला लूक दिला. आणि काहीही न बोलता तो पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला.

- Advertisement -

यानंतर शेवटच्या षटकात हेनरिक क्लासेनला बाद केल्यानंतर हर्षितने याचीच पुनरावृत्ती केली. हैदराबादला क्लासेनने अगदी सामना जिंकण्याच्या जवळ आणून ठेवले. मोठा फटका खेळण्याच्या नादात हर्षितच्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि इथूनच सामना केकेआरच्या बाजूने फिरला. मात्र, विजयानंतरही चर्चा रंगली ती हर्षितच्या गैरवर्तणुकीची. हर्षितच्या गैरवर्तणुकीमुळे आयपीएलने त्याच्यावर मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावला आहे. आयपीएलच्या म्हणण्यानुसार, हर्षितने सामन्यादरम्यान दोनदा आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल-1चे उल्लंघन केले आहे. या कारणामुळे केकेआरच्या या गोलंदाजाला मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. हर्षितने त्याच्यावर लावण्यात आलेला दंड स्वीकारला आहे.

हेही वाचा – Arvind Kejriwal Arrest: केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत INDIA आघाडीची मेगा रॅली; आप-काँग्रेसची घोषणा

हर्षित राणाने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ चे दोन गुन्हे केले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांसाठी त्याला मॅच फीच्या १० टक्के आणि ५० टक्के दंड ठोठावण्यात आला. राणाने दोन्ही गुन्ह्यांची कबुली देत मॅच रेफरीची शिक्षा स्वीकारली. आचारसंहितेच्या लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

गावस्करांनी व्यक्त केली नाराजी

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मात्र या युवा भारतीय अनकॅप्ड वेगवान गोलंदाजावर नाराजी व्यक्त केली. “हर्षित राणाने असे करणे योग्य नाही. त्याच्या गोलंदाजीवर षटकार मारल्यानंतर फलंदाजाने असे काही केले का? अशा कृत्यांशिवाय क्रिकेट खेळता येते. हे टेलिव्हिजनचे युग आहे, हे मला कळते. आपल्या सहकाऱ्यांसोबत सेलिब्रेशन करा, पण विरोधी संघासोबत असे करणे चुकीचे आहे”, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -