बाळ ६- ७ महिन्याचे झाल्यानंतर बाळाचे दात यायला सुरुवात होते. लहान मुलांसाठी हा काळ थोडा कठीण असतो. बाळाचे दात येताना हिरड्यांमध्ये वेदना जाणवू लागतात. तसेच अनेकांना अतिसाराचा त्रास होतो. त्यामुळे बाळाची योग्यरीत्या काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्यास या काळात बाळाला त्रास जाणवणार नाही. पाहुयात, काही घरगुती उपाय ज्याने बाळाला हिरड्यांना येणारी सूज किंवा दुखण्यापासून आराम मिळेल.
‘या’ गोष्टी खायला द्या
दात येताना मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे बाळाला यादरम्यान योग्य आहार द्यायला हवा. भाज्यांचे सूप, स्मॅश केलेले केळे, मूग डाळीचे पाणी अशा गोष्टींचा मुलांच्या आहारात समावेश करावा.
मसाज केल्याने होईल फायदा
मुलांना जेव्हा दात येतात तेव्हा हिरड्यांमध्ये वेदना किंवा सूज येऊ शकते. त्यामुळे मुले रडू लागतात. मातेला नक्की काय करायचे हे कळत नाही. अशावेळी तुम्ही हात स्वच्छ करून हलक्या दाबाने हिरड्यांना मसाज करू शकता. याशिवाय, बाळाच्या गालावर ऑरगॅनिक तेलाने मसाजही करू शकता याने बाळाला बराच फरक जाणवेल.
हिरड्या स्वच्छ करणे महत्वाचे
खायला दिल्यानंतर हिरड्या स्वच्छ करणे हे सुद्धा महत्वाचे आहे कारण अन्नाचे कण हिरडयांना चिटकू शकतात. अशाने बॅक्टेरिया संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना स्वच्छ मऊ कपड्याने हलक्या हाताने हिरड्या स्वच्छ करा.
लिक्विड देणे गरजेचे
जर दात येताना मुलाला अतिसाराचा त्रास होत असेल तर अशावेळी लिक्विड देणे गरजेचे असते. पण, त्या आधी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
हेही वाचा ; विसराळूपणा वाढत चाललाय? मग दररोज खा ‘हे’ पदार्थ