Vastu Tips : वास्तुशास्त्रात गरम तव्यावर पाणी टाकू नये; जाणून घ्या काय आहे या मागचे कारण

वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेपासून ते कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी इथपर्यंत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर वास्तुशास्त्र आयुष्यातील अशा अनेक गोष्टींबाबत मार्गदर्शन सुद्धा करते. आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये स्वयंपाक घराला आणि तिथल्या वस्तूंना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अशीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा. तव्याचा वापर प्रत्येक घरात दररोज केला जातो. याच तव्याचा वापर कसा करायला हवा? तो स्वयंपाक घरात कोणत्या दिशेला ठेवायला हवा? ही सर्व माहिती आज नक्की जाणून घ्या.

गरम तव्यावर चुकूनही पाणी टाकू नका
आपण अनेकदा ऐकलं असेल की गरम तव्यावर पाणी टाकणे अशुभ मानले जाते, पण खरंतर या मागचे नक्की कारण काय आहे. हे कोणालाच माहित नाही.

  • वास्तु शास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो. या आवामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
  • खरंतर तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे, त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहू ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा. वास्तु शास्त्रानुसार तवा स्वयंपाक घरात नेहमी अशा जागी ठेवावा, जिथे बाहेरच्या व्यक्तीची नजर त्यावर पडणार नाही.
  • तवा नेहमी आडवा ठेवावा, त्याला कधीही उभा करून ठेवू नये.
  • तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये. याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा. नाहीतर घरात दरीद्रता येते.
  • तव्यावर चपाती/ भाकरी भाजण्याआधी त्या थोडे मीठ टाकावे,असं केल्यास घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही.

 

 


हेही वाचा :Vastu Tips : शास्त्रात ‘या’ दिशेकडे तोंड करून जेवणे मानले जाते अशुभ