Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthगरजेपेक्षा अधिक Vitamin D चे सेवन करणे आरोग्यासाठी ठरु शकते घातक

गरजेपेक्षा अधिक Vitamin D चे सेवन करणे आरोग्यासाठी ठरु शकते घातक

Subscribe

एक हेल्दी आणि तंदुरुस्त शरिरासाठी तुमच्या डाएटची फार महत्त्वाची भुमिका असते. डाएटमध्ये आपण भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वांचा समावेश करतो. त्यापैकीच एक म्हणजे व्हिटॅमिन डी. खरंतर व्हिटॅमिन डी हे आपल्याला सुर्यप्रकाशातून मिळते. ते शरिरासाठी फार महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण ताप, हृदयासंबंधित आजार यामुळे दूर राहतात. (Vitamin d disadvantages)

हाडांच्या आरोग्यासाठी आणि बळकटीसाठी व्हिटॅमिन डी फार महत्त्वाचे असते. मात्र त्याचा शरिरातील स्तर कमी झाला तर पुढील काही लक्षण दिसून येतात.
-अधिक थकवा येणे
-स्नायू कमजोर होणे
-हाडं कमजोर झाल्याने फ्रॅक्चर होण्याची शक्यता

- Advertisement -

व्हिटॅमिन डी चे अत्याधिक प्रमाणात सेवन केल्याने शरिराला नुकसान पोहचू शकते. यामुळे रक्तातील कॅल्शिअम धोकादायक स्तरावर पोहचणे, किडनीसंबंधित समस्या, पचनासाठी समस्या, हाडांसंदर्भात समस्या आणि आरोग्यासंबंधित अन्य समस्या जसे की, भूक न लागणे, उलटी येणे, थकवा येणे.

- Advertisement -

किती प्रमाणात व्हिटॅमिन डी घ्यावे?
जेव्हा व्यक्ती 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेला असेल तर त्याने 800 आयईयू व्हिटॅमिन डी घेण्याची गरज असते. तसेच जेव्हा 1-70 वयोगटातील व्यक्तींनी 600 आयईयू व्हिडॅमिन डी चे सेवन केले पाहिजे. 12 महिन्यांपर्यंत मुलांना दररोज 400 इंटरनॅशनल युनिट व्हिटॅमिन डी ची गरज असते. हे व्हिटॅमिन डी शरिरासाठी फार महत्त्वाचे असते. याचे प्रमाण कमी झाल्यास तर समस्या उद्भवते. अधिक झाल्यास तरीही नुकसान पोहचते. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन डी चे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्या.


हेही वाचा- Monsoon: पावसाळ्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता अशी करा पूर्ण

- Advertisment -

Manini